आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wager Issue At Solpur Railway Station & Bus Stand

स्टेशन पोलिस चौकीच्या अवती-भोवती चालतो मोठय़ा प्रमाणात जुगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक परिसरात मटक्याचा बाजारच भरत असल्याचे चित्र आहे. या परिसरात वाहतूक पोलिसांची नेहमी रेलचेल असते. स्टेशन पोलिस चौकीच्या अवती-भोवती मटक्याचा जुगार बिनधास्तपणे सुरू आहे. या मटका टपर्‍यांमधून प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात लूट होत आहे. मटक्यास नेमके अभय कोणाचे हाच संशोधनाचा विषय बनू पाहतो आहे.

केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांचा दौरा आणि त्यातच ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेमुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण होता. त्यामुळे त्यांना अवैध व्यवसायावर नियंत्रण आणण्यास वेळ नव्हता.

बहुधा त्यामुळे मटका बुकीचालकांनी पुन्हा जोमात मटका सुरू केला आहे. ‘दिव्य मराठी’ने मटकामुक्त सोलापूर ही मोहीम हाती घेतली. प्रारंभी पोलिसांची साथ मिळाली नाही. नंतर मात्र टप्प्या-टप्प्याने मटक्यावर कारवाई सुरू झाली आणि खुलेआम मटका बंद होऊन चोरी-छुपके झाला होता. स्टेशन, बसस्थानक परिसरात मात्र मटका पुन्हा खुलेआम सुरू आहे.