आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३२७ टन कचरा उचल : ठेकेदार; तरीही शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तोकडीयंत्रणा आणि नियोजनाच्या अभावामुळे शहरात कचऱ्याच्या समस्येला सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात चौकाचौकात कचऱ्याचे ढीग साचलेले िदसतात. दुसरीकडे शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता घेतलेल्या समिक्षा कंपनीकडून दररोज ३२७ टन कचरा उचलला जात असल्याचा दावा केला जात आहे. कंपनीने गेल्या नऊ महिन्यांत ८६ हजार ३७४ टन कचरा उचलणे आणि देखभाल दुरुस्तीपोटी कोटींचे बिल महापालिकेकडे सादर केले आहे. या पत्रानुसार मक्तेदाराने दररोज ३२७ टन कचरा उचलला असल्याचे दिसते. मात्र, शहरातील साचणारा कचरा आणि कंपनीचा दावा यात फरक दिसून येतो.

२०१२मध्ये खासगीकरण
जून२०१२ पासून शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता समिक्षा कंपनीकडे देण्यात आला. तेव्हापासून कचऱ्याची विल्हेवाट कंपनीमार्फत होते. दहा लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरात एक व्यक्ती ३०० ग्रॅम कचरा निर्मिती करते. त्याप्रमाणे शहरात दररोज ३०० टन कचरा निर्माण होणे अपेक्षित असताना कंपनीने दररोज ३२७ टन कचरा उचलला जात असल्याचा दावा केला आहे. शहरातील प्रभागानुसार कचरा उचलण्यासाठी १०२ घंटागाड्या, १५ कॅाम्पेक्टर, बॅाबकट वाहन आवश्यक आहेत. मात्र ५२ घंटागाड्या इतर वाहनांच्या माध्यमातून कचरा नियोजन करते. तोकडी यंत्रणा असताना ३२७ टन कचरा उचलणे कसे शक्य होते, असा सवाल आहे.

घंटागाड्या ५२ (एकगाडी ५०० किलो) - रोज चार खेपाप्रमाणे १०४ टन
डंपींगटॅक्टर (दोनटन )- रोज दोन खेपाप्रमाणे ३२ टन
कॅाम्पेक्टर१२ (एकगाडी पाच टन) - रोज दोन खेपाप्रमाणे १२० टन
एकूणवाहने ७५ -२५६ टन (पूर्ण क्षमतेने चालले तर )

चौकशी करू
*मक्तेदारांनीकचरा उचलणे आणि वाहन दुरुस्ती असे मिळून सात कोटींचे बिल सादर केले आहे. मात्र, कंपनीने िकती कचरा उचलला यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर बिल अदा केले जाईल. डॅा.पंकज जावळे, सहाय्यकआयुक्त, मनपा आरोग्य विभाग

मक्ता रद्द करा
*मक्तेदारशहरातील कचरा उचलत नाही. तेथील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देत नाही. कचऱ्यांचे खासगीकरण चुकीचे आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपाची बदनामी सुरू आहे .त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांकडे ही व्यवस्था द्या. अशोकजानराव, मनपा,कामगार संघटना अध्यक्ष

पूर्वी१८० टन कचरा
*२०१२मध्ये शहरात रोज १८० ते २०० टन कचरा निर्मिती होत होती. शहरातील कचरा पूर्णपणे उचलला जात नव्हता त्यामुळे खासगीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या बिलाची चौकशी करणार आहे. जयंतीअडके, मनपा,आरोग्य अधिकारी
* कचरा उचलण्यासाठी ४०० कर्मचारी
* शहरात १२०० ठिकाणी कचरा पडतो
* ७५ वाहने उचलतात कचरा
* घरोघरी कचरा उचलणे ७५ टक्के भागात बंद
*करारानुसार कामे नाहीत
कचऱ्याचे गणित जुळत नाही
समिक्षाकंपनीकडे असलेल्या ७५ गाड्या पूर्ण क्षमतेने चालल्या तर रोज सुमारे २५६ टन कचरा उचलण्याची क्षमता असताना कंपनीकडून दररोज ३२७ टन कसा उचलला जातो हे गणित जुळून येत नाही.
मागील नऊ महिन्यंात ८६ हजार ३७४ टन कचरा निर्मिती झाली असून कचरा उचलणे आणि देखभालीपोटी कंपनीने मनपाकडे सात कोटी रुपयांची मागणी केली आहे. सरासरी ३२७ टन कचरा उचलल्याचे कंपनीने मनपास कळवले आहे. याशिवाय मनपा वाहनाचे खर्च दुरुस्तीचेही बिल सादर केले आहे.
कचरा निर्मिती दुपटीने वाढली
दुसरीकडेशहरातील कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. शहरातील घरोघरी जाऊन कचरा उचला असे करारपत्रात नमूद असताना उचलले जात नाही. २०१२ मध्ये मनपाकडे कचरा उचलण्याची जबाबदारी होती शहरात रोज १८० ते २०० टन कचरा उचलला जात होता. परंतु खासगीकरण झाल्यानंतर दोन वर्षांत कचरा उचलण्याचे प्रमाण ३२५ टनापर्यंत म्हणजे दुपटीने वाढले. त्यामुळे संशयाला जागा निर्माण झाली आहे. मक्तेदारांनी दिलेल्या बिलाची चौकशी मनपाने सुरू केली आहे.