आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची पेट्रोल उधळपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जागतिक चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोन्याच्या मोहापासून दूर राहण्याचे आणि इंधन बचतीसाठी आवाहन केले आहे. पंतप्रधानांचे आवाहन डावलत काँग्रेस शहर कमिटीने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मोटारसायकल फेरी काढली. त्यात सुमारे सव्वासहा हजार रुपयांचे पेट्रोल जळाले. अमेरिकन डॉलर 97 खर्ची पडले. यातून विधायक काम झालेले नसल्याने एका अर्थाने पेट्रोल वाया गेले आहे.

पोलिसांकडून टोलवाटोलवी
काँग्रेसच्या मोटारसायकल फेरीप्रकरणी कोणतीही माहिती सदर बझार, फौजदार चावडी या दोन्ही पोलिस ठाण्याने नोंदवलेली नव्हती. आमच्याकडे काहीच नोंद नाही, असे उत्तर पोलिसांनी दिले. तर कार्यक्रमांची परवानगी घेतली होती, असा दावा काँग्रेसने केला आहे.

10 किलोमीटरला एका वाहनाला इंधन :0.25 लिटर, खर्च झालेली किंमत 97 डॉलर, खर्च झालेली भारतीय किंमत 6 हजार 225 रुपये

यापुढे अशी फेरी नाही
फेरीत इंधनावर खर्च झाला आहे. ही बाब उशिरा लक्षात आली. त्यामुळे आज दुपारी आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कोणताही एक दिवस वाहन न वापरता इंधन बचत करावी. यापुढे अशी फेरी निघणार नाही.
- धर्मा भोसले, शहराध्यक्ष, काँग्रेस