आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सडलेल्या तांदूळ पोत्यांची अखेर लावली विल्हेवाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पानगल, कमरुन्निसा, युनियन एज्युकेशन या तिन्ही प्रशालेअंतर्गत असलेल्या एका खोलीत शालेय पोषण आहारातील 100 ते 125 पोती तांदूळ सडून दुर्गंधी पसरल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. या प्रकारावर ‘दिव्य मराठी’मध्ये 29 जून रोजीच्या अंकात प्रकाश टाकण्यात आला होता. याची दखल घेत मंगळवारी त्या तांदळाची विल्हेवाट लावण्यात आली.

वर्षभरापूर्वी शाळेच्या एका खोलीत शालेय पोषण आहारातील 100 ते 125 तांदळाची पोती सडलेल्या अवस्थेत आढळून आली होती. युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित असलेल्या या तिन्ही शाळेतील या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाईचे सत्र सुरू झाले. कारवाई प्रक्रिया सुरू झाली तरी तांदळाच्या पोत्यांची विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर त्या खोलीतील तांदूळ आणखी सडून दुर्गंधी पसरली. तांदूळ ठेवण्यात आलेल्या खोलीवरील पत्रे मोडकळीस आल्यामुळे समस्येत आणखी भर पडली. शिवाय सडलेल्या तांदळाच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. याबाबत ‘दिव्य मराठी’त बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे यांनी माहिती घेऊन लगेच कारवाई करतो, अशी हमी दिली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी शालेय व्यवस्थापनाला तांदूळ विल्हेवाट संदर्भात सूचना दिल्या. त्यानंतर मंगळवारी दुपारी 1 वाजता खोलीतील सडलेला तांदूळ हलवण्यात आला. असे संस्थेचे अध्यक्ष जैद शेख यांनी सांगितले.