आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार योजना, ३१२ गावांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दुष्काळ निवारण टंचाईमुक्त गावे करण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३१२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. मंद्रूप (दक्षिण सोलापूर) येथे पालकमंत्री िवजयकुमार देशमुख यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ होईल. प्रत्येक तालुक्यात प्रथम कामांचा प्रारंभही होणार आहे. ही कामे मे २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली

जलयुक्त शिवार राबवण्यासाठी शासनाने दिलेल्या निकषानुसार ३१२ गावांची निवड करण्यात आली. येत्या वर्षांमध्ये जिल्ह्यातील ११४४ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी ११६२ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. चालू वर्षामध्ये ३०७ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून ६९ कामे सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.

तालुकानिहाय पात्र गावे...
जलयुक्तशिवार अभियानासाठी शासन निकषानुसार २८० गावे निवडण्याचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात यासाठी ३१२ गावे पात्र ठरली आहेत. यामध्ये सांगोला तालुक्यातील सर्वाधिक ७८ गावांचा समावेश आहे. उत्तर सोलापूर ११, दक्षिण सोलापूर ७, अक्कलकोट ९, मोहोळ १५, माढा ४६, करमाळा ३९, बार्शी ३३, पंढरपूर २०, सांगोला ७८, मंगळवेढा ४७, माळशिरस ७.

अभियानात अशी होणार कामे...
जलस्रोताचीदुरुस्ती, गाळ काढणे, पाझर तलाव दुरुस्ती, पाणी अडवा, पाणी जिरवा आदी कामे करण्यात येणार आहेत. शिवाय टंचाईग्रस्त गाव टँकरमुक्त कसे होईल, यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. कामे मेपर्यंत मार्गी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिली.

विभागनिहाय निधी असा...
जलयुक्तशिवार अभियान विभागाला कामे करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
कृषीविभाग : ६७कोटी लाख
लघुपाटबंधारे : कोटी८८ लाख २२ हजार
ग्रामीणपाणीपुरवठा विभाग : १५०कोटी,
लघुसिंचन :७९कोटी २६ लाख
जलसंपदा: कोटी७६ लाख
भूजलसर्वेक्षण : ३८कोटी २५ लाख
एकूण: ३०७कोटी ६३