आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुणे रोड येथील अवंतीनगर परिसरातील पाण्याच्या मुख्य टाकीच्या खालील जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. परंतु नागरिकांनी पाण्याच्या टाकीलाच गळती लागल्याची अफवा पसरवली. जलवाहिनीला गळती लागल्यानंतर अवघ्या दोन तासांत संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन गळतीच्या दुरुस्तीचे काम होती घेतले. मात्र, दिवसभर गळती सुरूच होती. सायंकाळी सर्व परिसरात पाणीच पाणी झाले होते.
अवंतीनगर येथील पाण्याच्या मुख्य टाकीखाली भर घालण्याचे काम सुरू आहे. भर घालताना मोठे दगड जलवाहिनीवर पडले आणि ती फुटली.
हा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. रविवारी सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर हजारो लिटर पाणी रस्त्यावर पसरले. नागरिकांनी पाण्याच्या टाकीला गळती झाल्याची चर्चा केली आणि ती बघता बघता पसरली. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस.के. उस्तुरगे यांनी मक्तेदार आणि संबंधित कर्मचार्‍यांनी घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करून लगेच गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, दिवसभर पाणी वाया गेले. या परिसरात पाणीच पाणी दिसत होते. सकाळी या भागात भर घालत असताना जलवाहिनी फुटली होती. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. परंतु त्यानंतरही गळती लागली होती.
टंचाई असताना हजारो लिटर पाणी वाया
एक तर पुरेसे पाणी नाही. आशातच पाण्याच्या टाकीजवळ गळती झाल्याने पाणी भरपूर वाया गेले. टाकीजवळच आमचे घर आहे. त्यामुळे टाकी खालून पाणी येत असल्यामुळे भीती वाटत होती.’’ दिव्या फुलसुंदर, नागरिक