आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनटीपीसी जलवाहिनी ५१ किमीपर्यंत; सोलापूरचे काम अडकले भू-संपादनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर- फताटेवाडीयेथे उभारण्यात येत असलेल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी उजनी धरणातून पाणी आणावयाच्या दुहेरी जलवाहिनीचे ५१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. ३०० कोटींच्या या प्रकल्पातून सोलापूर शहरासाठी पाणी देण्याची तयारी एनटीपीसीने केली आहे. मात्र, त्यासाठी भू-संपादन झाल्याने हे काम प्रतीक्षेत आहे. दक्षिण तालुक्यातील फताटेवाडी, होटगी स्टेशन आहेरवाडी या तीन गावाच्या मध्यवर्ती एनटीपीसीच्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.
हजार ६१४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून १३२० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे बॉयलर, चिमणीचे काम पूर्ण होत आहे. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेची व्यवस्था असल्याने कोळसा आणण्यात अडचणी नाहीत. सर्व डी छायाचित्रे रामदास काटकर, अप्पाराव शिमगे आणि दत्तराज कांबळे यांनी काढली आहेत.
दोन समांतर पाइपलाइन
एनटीपीसीतर्फेदोन समांतर पाइपलाइन टाकण्यात येत आहेत. त्यातील एक पर्यायी व्यवस्था म्हणून असेल. याची वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंतची आहे. २०१६ पर्यंत ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा मानस एनटीपीसीच्या अिधकाऱ्यांचा आहे. त्यानुसार हे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले.
३०० कोटींचे काम सुरू
उजनीधरणातून पाणी आणण्यासाठी एनटीपीसीने ३०० कोटींचे काम सुरू केले आहे. हे काम एकूण ११५ किलोमीटर अंतराचे आहे. त्यासाठी ११०० एम. एम.ची मोठा दुहेरी पाइप आहे. उजनी धरण ते देवडी गाव ४५ कि.मी. अंतर असून देवडी येथे उंच टाकी बांधण्यात येणार आहे. तेथे कि.मी. काम झाले.
२५० कोटींची तरतूद : तत्कालीनकेंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विशेष लक्ष घालून एनटीपीसी योजनेतूनच सोलापूरला पाणी मिळेल यासाठी २५० कोटींचा निधी मंजूर केला. तेही काम आता सुरू झाले आहे. उजनीतून पाणी आणण्यासाठी धरणामध्ये जॅकवेल उभारून देवडी येथे ६० हजार क्युसेक पाणी क्षमतेची टाकी उभारण्याचे काम सुरू केले आहे. या योजनेतून सोलापूर शहर प्रकल्पग्रस्त तीनही गावांना पाणी देण्याचा निर्णय एनटीपीसीने घेतला आहे.

सोरेगावयेथे साठवण टाकी :उजनीकडून पाइप टाकून सोरेगाव येथे मोठी साठवण टाकी बांधण्याचे नियोजन आहे. पण हे काम करण्यासाठी राज्य शासनाने जमीन संपादित करून देणे महत्त्वाचे आहे. जमीन संपादित करून दिल्यास महिन्यांत काम पूर्ण होईल, असे एनटीपीसीचे अिधकारी सांगतात. मात्र, अद्याप जमीन संपादित झाली नाही.