आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीचे ‘लाइफ’ संपल्याने गळतीची समस्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अंतर्गत बहुतेक जलवाहिनीच्या कालमर्यादा संपल्याने गळतीची समस्या वाढली आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. १९६८ मध्ये टाकण्यात आलेल्या जलवाहिनी बदलण्याबाबत सात ते आठ वर्षापूर्वी नियोजन अपेक्षित होते. मात्र, तसे झाल्याने पाणी टंचाईची समस्या वाढत चाललेली आहे. तर दुसरीकडे पाणी गळती आणि उपाय योजना याबाबत महापालिकेकडे ब्ल्यू प्रिंट नसल्याचे वास्तव समोर आलेले आहे. नियोजन नसताना तुम्ही समस्येवर नियंत्रण कसे मिळवणार अशी सध्या परिस्थिती आहे.

१९६८ मध्ये शहरातील बहुतेक भागात जलवाहिनी टाकण्यात आली. त्याचा वापर आजही करण्यात येत आहे. कालमर्यादा ओलांडली तरी जलवाहिनी बदलली नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन पाण्याचे नियोजन होत नाही, असे दिसून येत आहे. १९९२ ला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रयत्न केल्याने उजनी ते सोलापूर जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीची दुरुस्ती झाली. पण, अंतर्गत जलवाहिनी बदलण्यात बाबत कसलेच नियोजन महापालिकेकडे नाही.

मनपाकडे नाही ब्ल्यू प्रिंट
सुरळीत नियोजनासाठी विकासाचे ब्ल्यू प्रिंट आवश्यक असते. शहरात पाणी पुरवठा सुरळीत असावा यासाठी महापालिकेकडे कोणत्याही प्रकारची ‘ब्ल्यू प्रिंट’ नाही. जिथे समस्या निर्माण होईल तिथे डागडुजी करणे अशी कामे सुरू आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात खूप जुनी जलवाहिनी आहे. काही ठिकाणी दूषित पाण्यामुळे आजार उद््भवत आहेत.

योजना नावालाच
नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आले . मात्र, या निधीचे योग्य नियोजन झाले नाही. समस्या निर्माण झाली तरच तिथेच फक्त पाइप लाइन बदलण्यात येते.

जलवाहिनी बदलण्याची गरज
१९६८पासून अंतर्गत जलवाहिनीचा वापर होत आहेत. या पाइपचे ‘लाइफ’ १० ते १५ वर्ष असते. पूर्वी लोखंडी पाइपचा वापर केला जात होता. पाण्यामुळे लोखंडी पाइप जीर्ण झाले आहेत. त्यामुळे पाइपलाइन फुटण्याचा प्रकार घडत आहे. यातून गळती होते.

पाणी टंचाईचे ऑडिट / भाग :
नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून काम चालू आहे. त्यामुळे पाणी गळती समस्या वाढत आहे. हद्दवाढ भागात जलवाहिनी नवीन टाकण्यात आली आहे. काही ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. गंगाधरदुलंगे, प्र आरोग्य अधिकारी