आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Management Minister Dilip Sopal And DCM Pawar Meeting.

दिलीप सोपल मंत्री होताच अजित पवारांकडून 64 कोटींच्या कामांना हिरवा कंदील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोरेगाव ते टाकळी (18 किलोमीटर लांबीची) आणि कोंडी ते जुना पुणे नाका (1200 मिलीमीटर व्यासाची) पाइपलाइन बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला. 64 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून दुसर्‍या टप्प्यात समाविष्ट करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यास पवार यांनी होकार दिला. त्यानुसार तातडीने प्रस्ताव देण्याचे आदेश त्यांनी दिले. सोरेगाव ते टाकळी ही लाइन जीर्ण झाली आहे. त्यामुळे ती वारंवार फुटते.

मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली. पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, आमदार दीपक साळुंखे, सभागृह नेते महेश कोठे, उपमहापौर हारून सय्यद, इब्राहिम कुरेशी, दिलीप कोल्हे, नगरविकास खात्याचे सचिव र्शीकांत सिंग, आयुक्त अजय सावरीकर, नगर अभियंता सुभाष सावस्कर, सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे, डॉ. पंकज जावळे आदी उपस्थित होते.

आराखडा तयार करून देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार नगरोत्थान योजनेतून दोन्ही पाइपलाइन दुसर्‍या टप्यात समाविष्ट करणे आणि संगणकीकृत पाणीपुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करून शासनाकडे देण्यात येणार आहे. अजय सावरीकर, मनपा आयुक्त

रिक्त पदासाठी नावे सूचवा
महापालिकेत अप्पर आयुक्त, दोन उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त, नगर रचना अधिकारी, आरोग्य अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक अशी सात पदे रिक्त असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या पदावर जाण्यासाठी इच्छुकांची नावे असतील तर द्या, त्यांची नेमणूक करण्यात येईल, तसा आदेश सचिवांना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.
महापौरसह आमदारांची पाठ
शहर विकासासाठी बोलवलेल्या बैठकीसाठी काँग्रेसचे महेश कोठे वगळता अन्य कोणी उपस्थित नव्हते. आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यव्यस्तामुळे बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. महापौर अलका राठोड यांची प्रकृती बिघडल्याने त्याही गेल्या नाहीत.
बघू-करू तर होणार नाही?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार प्रस्ताव तयार करण्यात येईल. त्यानंतर त्यास मंजुरी मिळण्यासाठी बघू-करू असे तर होणार नाही ना?