आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Meter Test Report Facility Available In Solapur

वॉटर मीटर टेस्ट रिपोर्ट आता सोलापुरात मिळेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) चिंचोळी औद्योगिक वसाहतीत वॉटर मीटर टेस्ट रिपोर्टची सोय करून दिली आहे. एक नोव्हेंबरपासून ही सुविधा मिळणार असल्याची माहिती नॉर्थ सोलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे यांनी दिली.

वॉटर मीटर टेस्टची सोय महापालिकेने बंद केली. त्यामुळे उद्योजकांना पुणे किंवा सांगलीला जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा जात होता. त्या टाळण्यासाठी एमआयडीसीनेच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी असोसिएशनने पाठपुरावा केला. त्याला प्रतिसाद देऊन एमआयडीसीने ही सुविधा दिली. त्याचे उद्घाटनही करण्यात आले. या वेळी महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. एस. वराळे, उपअभियंता डी. आर. चौधरी, साहाय्यक अभियंता इ. जी. पाटील, असोसिएशनचे सचिव गणेश सुत्रावे, सिद्धाराम चिट्टे आदी उपस्थित होते. या नव्या सुविधेत 15 मिलिमीटर ते 150 मिलिमीटरपर्यंतच्या मीटर चाचण्यांचे दाखले मिळतील. उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा.

धोकादायक वळण
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून चिंचोळी औद्योगिक वसाहतीकडे देण्यात आलेले वळण धोकादायक असल्याचे असोसिएशनच्या सदस्यांनी कार्यकारी अभियंता वराळे यांना सांगितले. त्यात बदल करण्याची सूचनाही केली. वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा झाली, याकडेही लक्ष वेधले. त्यांच्या तक्रारी ऐकून घेत र्शी. वराळे यांनी सर्व कामांना मंजुरी मिळाली. आता फक्त निविदा काढण्याचे काम होईल, असे सांगितले.