आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवबौद्धांसाठीच्या नळ योजनेवरून गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांसाठीच्या मोफत खासगी नळ जोडणी योजनेसाठी पात्र ठरवलेल्या लाभार्थी यादीवरून मनपा सभागृहात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी फेर सर्वेक्षणाची मागणी केली. अनेक लाभार्थी वंचित राहिल्याचे सभागृह नेते महेश कोठे, अनिल पल्ली, रोहिणी पत्की यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. चर्चेअंती आयुक्तांना निर्णय घेण्याचा अधिकार एकमताने देण्यात आला. या वेळी सुशीलकुमार शिंदेंच्या अभिनंदनासाठी जुगलबंदी रंगली.

महानगरपालिकेची जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील तहकूब सभा मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता महापौर अलका राठोड यांनी बोलवली होती. सुरुवातीस चंदनशिवे यांनी रमाई आवास योजनेतील फसवणूकप्रकरणी निवेदन करण्याची मागणी केली. कालांतराने हा विषय टळला.

सुरेश पाटलांचा त्रागा
महापौर राठोड यांनी विषय एकमताने मंजूर असे म्हणताच नगरसेवक सुरेश पाटील यांनी संताप व्यक्त करीत लाज-लज्जा हा शब्द वापरत फाईल आपटली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला पण पाटील यांना भाष्य करता आले नाही. केंद्र सरकारच्या निधीतून चिप्पा मार्केट आणि गेंट्याल थिएटरसमोर हॉकर्स झोन, सार्वजनिक शौचालय, जलपुनर्भरण, बेघरांची वसाहतीसाठी आठ कोटी खर्चकरण्यास आवश्यक करार करण्याचा अधिकार आयुक्तांना देण्याचा निर्णय एकमताने झाला.

सभेत झालेले निर्णय
सक्षमता निर्मिती प्रकल्पबाबत निर्णयाचाआयुक्तांना अधिकार.
जिल्हा वार्षिक योजनेतून मोदी ख्रिश्चन स्मशानभूमी सुधारणा करणे.
अपघाती मृत्यू झालेल्या परिवहन कर्मचार्‍यांच्या वारसांस 10 हजार सांत्वनपर अनुदान
केंद्राच्या या योजनेसाठी सोलापूर शहराची निवड झाली. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अभिनंदनासाठी नगरसेवकांत चढाओढ लागली.