आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात पाण्यासाठी ओरड सुरूच...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- टँकर मक्तेदारांनी शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेले सेवाबंद आंदोलन रविवारी दुपारी 12च्या सुमारास मागे घेतले. पर्यायी व्यवस्था करूनही शहरातील पाणीटंचाईची ओरड सुरूच आहे. खुद्द सभागृहनेते, महापौरांच्या वॉर्डातच पाणीटंचाई असल्याने त्यांनीही याची गंभीर नोंद घेत तातडीची बैठक घेऊन सूचना केल्या. उद्याही बैठक होणार आहे.

सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापौर अलका राठोड यांनी रविवारी तातडीने महापौर निवासात पाणीपुरवठा अधिकार्‍यांची बैठक घेतली. शहरात शनिवारी होणारा पाणीपुरवठा रविवारी करण्यात आला. तीन दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. हद्दवाढ भागात पाच ते सहा दिवसापासून पाणी नसल्याने तेथील नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नगरसेविका जगदेवी नवले यांच्या प्रभागात पाण्याची ओरड आहे. महापालिकेचे सभागृह नेते महेश कोठे यांच्या प्रभागातही पाणी नाही. महापौर अलका राठोड यांच्या प्रभागातील माशाळवस्ती परिसरात पाणी नसल्याने नागरिक वैतागले आहे. आदित्यनगर पाण्याच्या टाकीत उजनीतून येणारे पाणी बंद झाल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

आज आढावा घेणार
पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने अधिकार्‍यांकडून सोमवारी आढावा घेणार आहे. अधिकार्‍यांनी मोबाइल बंद ठेवू नयेत, असे आदेश दिले आहेत. उजनी जलाशयातून दुबार उपशासाठी तीन जादा पंप बसवण्यास सांगितले आहे. पालिकेच्या वाहनात प्लास्टिक टाक्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात येईल.’’ अलका राठोड, महापौर

पाण्याच्या टाक्यांवर पोलिस सुरक्षा
साधू वासवानी उद्यान, भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाक्या असलेल्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्र देणार आहे. आरोग्य विभागाच्या वाहनातून प्लास्टिकच्या टाक्या ठेवून शहरात पाणीपुरवठा करण्यात येईल.’’ डॉ. पंकज जावळे, साहाय्यक आयुक्त, महानगरपालिका