सोलापूर - औज ते सोरेगाव जलवाहिनीवर बीपीटी यंत्रणा कार्यान्वित झाल्याने शहराला ते १० एमएलडी इतके पाणी वाढले. तरीही शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत आहे. बीपीटीचे काम पूर्ण झाल्यानंतर मे पर्यंत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिलेले अभिवचन पाण्यात विरले आहे. आता नव्याने पाण्याचे नियोजन करण्याचे काळम-पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांना आदेश दिले आहेत.
शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रथम १.६ कि.मी.चे काम, नंतर पंप हाउसची दुरुस्ती आता बीपीटी दुरुस्ती अशा एक ना अनेक उपाययोजना झाल्या. टाकळी पंप हाउसमधील चार पंपांद्वारे मे पासून उपसा सुरू झाला. साधारण १० एमएलडी पाणी शहराला अधिक मिळू लागले. आठ दिवसांनंतर आणखी एमएलडी पाणी वाढेल. यासाठी कोट्यवधीचा खर्च झाला, परंतु शहरातील पाणीटंचाई हटेना. अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत आहे.
वेळेपूर्वी कमी कसे झाले पाणी
कर्नाटकहद्दीतील शेतकर्यांकडून बंधार्यातील पाण्याचा उपसा होत असल्याने औजची येथील पाणी पातळी झपाट्याने खलावत आहे. सध्या केवळ १.९५ मीटर पाणी उपलब्ध असून ते २५ मे पर्यंत पुरेल, असा कयास आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी पत्र उजनी धरणातून शहरासाठी पाणी सोडण्याबाबतचे पत्र महापालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे. २५ मे पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तेथे असल्याचे मनपाने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पाणी वेळेपूर्वी कमी झाले कसे असा प्रश्न आहे.
आता जूनमध्ये पाणी
औज बंधार्यात पाणी सोड-ण्याबाबत मनपाचे पत्र मी परगावी असल्याने पाहिले नाही. जूनमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन होते.” अजयदाभाडे, अधीक्षक अभियंता
नियोजनाचे आदेश
बीपीटीमुळे पाणी वाढले. त्यामुळे पुरवठ्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत नियोजन हाईल.” विजयकुमारकाळम, मनपा आयुक्त
विस्कळीत भागासाठी नियोजन
पाणी आठ एमएलडीने वाढले. त्याचा उपयोग शहरातील विस्कळीत भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी केला जाणार आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे. हिप्परगा तलाव येथून पाणी उपसा सुरू झाल्यावर शहरात दोन दिवसांआड पाणी पुरवठा करता येईल.” गंगाधरदुलंगे, मनपा प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता
८०० एमएलडीचा हिशेब लागेना
जूनऐवजी २५ मे पर्यंत पाणीसाठा पुरेल, असा मनपाचा अंदाज आहे. बंधार्यातून रोज ८० एमएलडी पाणी उपसा होते. परंतु दहा दिवसांचे ८०० एमएलडी पाणी गेले कुठे, याचा हिशेब लागत नाही.
उन्हाळ्यात शहरात पाण्याची मागणी वाढते. विडी घरकुल, अक्कलकोट रोड, गावठाण भागात पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. मे पासून दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले, प्रत्यक्षात तसे झाले नाही. १० एमएलडी पाणी वाढवूनही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.” सुरेशपाटील, नगरसेवक
पाणी पातळी कमी होण्याची कारणे
- औज बंधारा येथे दरवाजांची निसटलेली प्लेट दुरुस्त करेपर्यंत मोठी पाणी गळती
- चिंचपूर येथील बंधार्याचे बरगे नादुरुस्त झाल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती
- टाकळी पंप हाउसमधील चारही पंप पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने उपसा वाढला
जूनपासून दिवसाआड पाणी मिळेल का?
शहरात जूनपासून दिवसाआड पाणी पुरवठा करता येईल अशी सूचना मनपा अंदाजपत्रकात सत्ताधारी आघाडीकडून करण्यात आली. त्यानुसार पाठपुरावा दिसून येत नाही. पाणी वाढले असताना तीन दिवसांआड पाणी का? असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे.
१० दिवस अगोदर औजमध्ये ठणठणाट
उजनीधरणातून सोडलेल्या टीएमसी पाण्यातून औज बंधारा एप्रिल रोजी पूर्ण क्षमतेने भरून घेतला होता. त्यानंतर शहरासाठी ६० दिवस पाणी पुरेल, असे महापालिकेचे नियोजन होते. त्यानुसार जून पर्यंत पाणी उपलब्ध राहणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात दहा दिवस अगोदर म्हणजे २५ मेपर्यंत पाणी साठा संपण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे.