आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दवाढमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत, उन्हाळ्यापूर्वी नागरिकांचे पाण्यासाठी होताहेत हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातपाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात चार दिवसांनंतरही पाणी आलेले नाही. यात प्रामुख्याने हद्दवाढ भागाचा समावेश आहे. पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे महापािलका प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहरातील नागरिकांना रोज 160 लिटर पाणी देणे बंधनकारक असताना ते दिले जात नाही. 1992 मध्ये हद्दवाढ झाली 2014 आले तरी तेथे नागरी सुविधांसह मुबलक पाणी देण्यास महापालिका असमर्थ ठरली आहे. या भागात चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांची ओरड सुरू झाली.
कल्याण नगर, आसरा, हत्तुरे वस्ती, नीलम नगर, नई जिंदगी, शिवगंगा नगर, सहारा नगर, मजरेवाडी, भारत माता सोसायटी, जानकी नगर, गोकुळ नगर, संतोष नगर, जवान नगर, माशाळ नगर, कोटणीस नगर, सैफुल, स्वामी विवेकानंद नगर, सोरेगाव, स्वागत नगर आदी ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

शहरात पाण्याची ओरड होत असताना पाणीपुरवठा विभागाशी संबंधित असलेले झोन अधिकारी आणि झोनमधील अभियंता पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील क्राँकीट रस्ते पाहण्यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्यासोबत गेले होते.
महापौर लक्ष घालतील
पाणीपुरवठाएक दिवसाआड झाला पाहिजे यासाठी आग्रही आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महापौरांना लक्ष घालण्यासाठी सांगितले आहे.” प्रणितीशिंदे, आमदार
प्रश्नतसाच आहे
महापालिकेतकाँग्रेसची सत्ता असून, शहरात पाणीपुरवठा चार दिवसांआड होत असताना त्यांच्याकडून काहीच होत नाही. आयुक्तांना भेटून सांगितले. पण काहीही फरक पडलेला नाही. शहरात कचरा आणि पाण्याचा प्रश्न तसा आहे.” विजयकुमारदेशमुख, आमदार
आयुक्तांशी बोलतो
शहरातचार दिवसांआड पाणीपुरवठा होत असेल तर शुक्रवारी महापािलका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यांशी बोलेन.” सुभाषदेशमुख, आमदार

वीज नसल्याने अडचण
बुधवारीवी जपुरवठा खंडित झाल्याने पाणीउपसा झाला नाही. त्यापूर्वी पाणीसाठा करण्यासाठी टाक्या नाहीत. त्यामुळे चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.” आर.एन. रेड्डी, उपअभियंता,पाणीपुरवठा विभाग
सांगूनकाय उपयोग
हद्दवाढआणि विशेषत: जुळे सोलापुरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मनपास सांगूनही काही फायदा होईना.” संतोषपाटील, नागरिक