आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकर्‍यांसाठी उजनीतून सोडले पाच टीएमसी पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर, अकलूज - आषाढी एकादशीला येणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या सोयीसाठी गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. तसेच, पिण्यासाठी उजव्या व डाव्या कालव्यातूनही धरणातून 15 दिवस पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती उजनी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी दिली.

उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रासह डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्याबाबत मुंबईत जलसंपदा मंत्री उर्वरित पान 12

शशिकांत शिंदे (कृष्णा खोरे) यांच्याबरोबर बुधवारी बैठक झाली होती. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यासह इतर नेत्यांनी भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने भूजलपातळीत वाढ झालेली नाही. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शनिवार-रविवारी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील काही भागात अद्यापही टँकर सुरू आहेत. वारकर्‍यांच्या सोयीसाठी नदीत आणि कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी मोहिते-पाटील यांनी केली होती.