आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे. सध्या तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या गुरुवारी सकाळी साडेअकराला महापालिकेची सभा होणार आहे. तीत हा विषय मंजूर होण्याची शक्यता आहे.
शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तीन स्रोतांपैकी उजनी धरण आणि औज बंधारा येथे पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखा दिवसाआड पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव भाजप-सेना युतीचे नगरसेवक जगदीश पाटील व अंजली चौगुले यांनी आणला आहे.
सभेच्या विषयपत्रिकेत हा विषय नाही. मात्र, पुरवणी विषयपत्रिकेत समावेश होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय मंजूर होण्याची शक्यता आहे. पाच दिवसांनी येणाऱ्या पाण्यामुळे सोलापूरकर वैतागलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी आचारसंिहता लागण्याआधी हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतील, अशी चर्चा आहे.प्रमुख विषयांमध्ये महापालिका प्राथमिक शाळेत संगणक प्रशिक्षण चालू ठेवणे, उपमहापौर निधीतून ५३ लाखांची कामे करणे यासह आदी विषय सभेपुढे आहेत.

नागरिक वैतागलेले
पाच दिवस पुरेल इतके साठवणे शक्य होत नाही. तेवढी साधने नाहीत आणि पाणीपुरवठा तितका वेळ होत नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच पाण्याचा ठणठणाट असतो. पुरेसे पाणी िमळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.
मोदींच्या दौऱ्यासाठी पाच लाखांचे झेब्रा क्राॅस
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी उपक्रमांच्या उदघाटनासाठी शहरात आले होते. विमानतळपासून येणाऱ्या आसरा ते डफरीन चौक दरम्यानच्या रस्त्यावर सहा चौकांत झेब्रा क्राॅस रंगवण्यात आले. त्यासाठी महापालिकेला चार लाख ९७ हजार ९५२ रुपये खर्च आला. हा विषय स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आहे. समितीची शुक्रवारी बैठक आहे. पोलिस प्रशासनाने दलिेल्या पत्रानुसार महापालिकेने काम केले आहे.
या चौकांत झाले काम (प्रत्येक ठिकाणी ९६ चौरस मीटर)
डफरीन चौक, जुना एम्प्लाॅयमेंट, सात रस्ता, गांधी नगर, महावीर चौक, आसरा चौक, मुलतानी आणि सहारा नगर.

बैठकीतील अन्य विषय
हिप्परगा तलाव येथे दुबार उपसा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी नविासस्थाने बांधणे
भौगोलिक मािहती यंत्रणेमार्फत (जीआयएस) सर्वेक्षण करणे नव्या जलवािहनीला िहरवा कंदील टाकळी ते सोरेगावदरम्यान नवीन जलवाहनिीसाठी १२७ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यास महाराष्ट्र जीवन प्रािधकरणाने गुरुवारी तांित्रक मंजुरी दलिी आहे. तत्पूर्वी प्रािधकरणाच्या समितीने ११० त्रुटी काढल्या होत्या. त्या महापालिका प्रशासनाने दूर केल्या. दरम्यान, पाठपुरावा झाला नसल्याने हा विषय प्रलंबित होता. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आल्यानंतर पाठपुरावा सुरू केला आहे. अंतिम मंजुरीसाठी शुक्रवारी नगरविकास विभागाचे सचवि श्रीकांत सिंग यांच्यासमवेत मुंबईत बैठक होणार आहे. महापालिकेचा मूळ प्रस्ताव १८७ कोटींचा होता. तो कमी करून १२७ कोटींचा करण्यात आला आहे.
"यूजर चार्ज घेऊ नका'
ड्रेनेज नसलेल्या भागातील मिळकतदारांकडून यूजर चार्ज घेऊ नये, असा आदेश स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांनी दलिा आहे. त्यांनी गुरुवारी यासंदर्भात झोन अधिकारी, कर संकलन आणि हद्दवाढ विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका प्रशासनाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
एलबीटी उत्पन्नात २० कोटींनी वाढ
गेल्या वर्षाच्या तुलनेत ‘एलबीटी’च्या उत्पन्नात २० कोटी ६८ लाखांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात अॅागस्ट २०१३ अखेर २५ कोटी ४१ लाख रुपये मिळाले होते. चालू वर्षात ही रक्कम ४६ कोटी ५ लाखांवर गेली आहे. आज गुरुवारी एका दिवसात एक कोटी १२ लाख रुपये वसूल झाले आहेत.
गाळे देण्याचा प्रस्ताव रद्द करा : चंदनशिवे
साधू वासवानी उद्यान आणि मित्रगोत्री पाण्याच्या टाकीजवळील गाळे देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी आणला आहे. तो रद्द करावा, अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशविे यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार आणि महापौर अलका राठोड यांच्याकडे केली आहे. परिसरातील फेरीवाल्यांना गाळे देताना प्राधान्य देणे आवश्यक असताना इतर लोकांना येथील गाळे देण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी आणला आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
कामकाजात सुसूत्रता आणणार : हेमगड्डी
सर्वसाधारण सभा वेळेत सुरू करण्यात येईल. महलिा सदस्यांना बोलण्यासाठी संधी दलिी जाईल, अशी माहिती सभागृह नेेते संजय हेमगड्डी यांनी दलिी. सभा वेळेत सुरू करण्याच्या मुद्द्यावर बुधवारी सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सुसूत्रपणा आणण्यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ६ सप्टेंबर रोजी महापौर पदाची नविडणूक होत असून, काँग्रेसचाच महापौर होईल, असेही हेमगड्डी म्हणाले.

‘एलबीटी’ रद्दचा प्रस्ताव
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा प्रस्ताव विरोधकांनी आला आहे. सभागृहात ‘एलबीटी’ रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठवावा, असे सूचवण्यात आले आहे. हा विषय येत्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत येण्याची शक्यता आहे. त्यालाही विधानसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याने मंजूर होण्याची औपचािरकता पूर्ण होईल असे समजते.
११ सराफांची सुनावणी
‘एलबीटी’ थकीत प्रकरणी ५५ सराफांना महापालिका प्रशासनाने यापूर्वी नोटीस बजावली होती. त्यांनी याबाबत नविेदन दलिे होते. त्यापैकी ११ प्रमुख सराफांना सोमवारी सुनावणीसाठी बोलवण्यात आली आहे.