आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा बंद, कुर्डुवाडीकरांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - जलवाहिनी फुटल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या प्रभागासह परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रमजान महिना सुरू आहे. तसेच आषाढी वारीसाठी येणारे वारकरी येथून जातात. अशावेळी शहरात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांतून संपात व्यक्त होत आहे.

शहरातील प्रभाग चारमधील सातव कॉलनी, पाण्याची टाकी, हनुमान मंदिर आदी भागात पाणीपुरवठा झाला नाही. या परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. या परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. तरीही पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले.

उद्या पाणीपुरवठा होईल
- प्रभाग चारसाठीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद होता. रविवारी दिवसांत पाणीपुरवठा होईल. ’’ अतुल शिंदे, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद, कुर्डुवाडी

दखल घेतली नाही
- नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तोंडी तक्रारी केल्या. चार दिवस पाणी आले नाही. मात्र काम सुरू आहे. पाणी येईल, असेच सांगत आहे. ’’ आनंद कोकीळ, नागरिक, सातव कॉलनी

संग्रहित छायाचित्र.