आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरेसा पाणीसाठा, तरीही दोन दिवसांआड पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - औज व चिंचपूरमध्ये असलेले पाणी शहराला एक दिवसाआड पुरवठा केल्यानंतरही येत्या जून अखेरपर्यंत पुरणार आहे. उजनी धरणातून शहराला 1 मे आणि 1 जुलै असे दोनवेळा पाणी सोडण्यात येणार आहे. परंतु सध्या उपलब्ध पाणी जून अखेरपर्यंत पुरणार असल्याने उजनीतून 1 मे ऐवजी 20 मेच्या पुढे पाणी सोडले तरी ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा शक्य आहे. दरम्यान, पाऊस पडला तर 1 जुलैला उजनीतून पाणी सोडण्याची गरज नाही. असे असताना दोन दिवसांआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय महापौर व आयुक्त यांनी घेतला आहे.

औज आणि चिंचपूर बंधार्‍यात पुरेसे पाणी असतानाही सत्ताधारी काँग्रेस शहरवासीयांना वेठीस धरत आहे. जिल्हाधिकारी यांनी महापौर व नगराध्यक्ष यांची बैठक घेऊन पाणी जपून वापरण्याची सूचना केली आहे. पण त्यांनी दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची सूचना केली नसल्याचेही स्पष्ट केले आहे. सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठय़ामुळे नागरिक पाणी साठवून ठेवतात. पुन्हा पाणी आल्यानंतर साठवलेले पाणी शिळे म्हणून टाकत आहेत.

लवकरच बैठक घेणार - नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी लवकरच महापौर, पदाधिकारी, आयुक्त, प्रशासन यांची बैठक घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठा होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’’ धर्मा भोसले, शहराध्यक्ष, काँग्रेस