सोलापूर-शहर हद्दवाढ भागातील उपेक्षित वसाहत प्रताप नगर तांडा. प्रामुख्याने बंजारा समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत. लोकसंख्या आठ हजारांच्या घरात पण; दरडोई पाणी मिळते केवळ साडेसात लिटर. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती असते. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने वसाहतीत विकासकामे करता येत नाहीत. अशा स्थितीत तेथील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार यांनी पुढाकार घेतला. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि लोकसहभागातून पाणीपुरवठा सुरू झाला.
या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा सोमवारी रात्री महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते झाला. या वेळी साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे, मुंबईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलसिंग पवार, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार हत्तुरे, प्रशांत वायकसकर, अंबादास नडगिरे, सुनीता जानराव आदी उपस्थित होते.
र्शी. पवार यांनी प्रास्ताविकेत नागरी समस्या विशद केल्या. 60 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतून 8 हजार लोकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. म्हणजेच माणसी साडेसात लिटर पाणी मिळते. ते आंघोळीसाठीही पुरत नाही. त्यामुळे पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागते. त्यावर उपाय करताना वर्गणी देण्यासाठी लोकच पुढे आले. जमलेल्या पैशातून खासगी जागेतील विंधन विहिरीला पंप बसवण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला, असे प्रा. पवार म्हणाले.
महापालिका सहकार्य करेल
समस्या सोडवण्यासाठी प्रताप नगरातील नागरिक ज्या पद्धतीने पुढे आले, समस्या सोडवून घेतली. ते कौतुकास्पदच आहे. परंतु असे केल्याने पालिकेची जबाबदारी संपली असे नाही. उलट अधिक जबाबदारीने काम करण्यास बांधील असून, यापुढे महापालिका या नगरातील समस्या सोडवण्यासाठी सर्व सहकार्य करीन. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त,महापालिका
महापालकेकडून साडेसहा लाख रुपये मिळावेत
तांड्याची जागा न्यायप्रविष्ठ आहे. 10 लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर आहे. परंतु जागा मिळत नाही. एका शेतकर्याने टाकीसाठी जागा देण्याचे कबूल केले. त्यासाठी साडेसहा लाख रुपयांचा मोबदला महापालिकेकडून त्याला अपेक्षित आहे. तीन वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. प्रा. भोजराज पवार, माजी नगरसेवक.