आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे नाका टाकीस गळती, स्वच्छतेबाबत होतेय दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुणे नाका येथील पाच एमएलडी पाणी क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. तसेच टाकीचा काही भाग कोसळला आहे. १९९२ मध्ये या टाकीची उभारणी झाली. टाकीचे बांधकाम ५० वर्षे क्षमतेचे असताना २४ वर्षांत गळती लागली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेचे पाण्याच्या टाक्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील ३४ पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा रामभरोसे आहे. एकाही टाकीस सुरक्षा िभंत नाही, देखभालीसाठी सुरक्षा रक्षक नाहीत. पाण्याचा टाकीचा परिसर म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशी स्थिती आहे. जुगार, अवैध धंदे याठिकाणी मा ेठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. पुणे नाका येथील पाच एमएलडीच्या दोन टाक्या असुरक्षित आहेत. गळती लागली असतानाही मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

एकहीटाकी धुतली नाही
दरवर्षीपावसाळ्यानंतर पाण्या
च्या टाक्या धुवाव्यात, असे नियम आहेत. तसे पाण्याच्या टाकीवर त्यांच्या तारखा नमूद करणे आवश्यक आहे. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल यांची काय गॅरंटी असा सवाल उपस्थित होतो.

आरोग्याचा प्रश्न
पाण्याच्याटाक्यांना सुरक्षा नसल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. मध्यंतरी गांधीनगर जवळील डीएसपी टाकीत कुत्र्याचे पिलू पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानानी ते काढले. सुरक्षेअभावी असे प्रकार नेहमीच घडण्याची शक्यता असते.

२४ वर्षांपूर्वीचे काम
उजनीजलवाहिनीचे काम झाल्यानंतर १९९२ मध्ये पुणे नाका येथे दोन एमबीआर टाक्या उभारण्यात आल्या. या टाक्याचे आयुष्य ५० वर्षांचे आहे. मात्र, २४ वर्षांत गळती लागली असल्याने दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतो

पाहणी करण्यात येईल
-पुणेनाका येथील पाण्याच्या टाक्यांना गळती असल्याची माहिती नाही. सोमवारी टाक्यांची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. पावसाळ्यानंतर टाक्या धुतल्या पाहिजे हे मान्य आहे. अंबऋषीरोडे, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता

तत्काळदुरुस्ती हवी
-पाण्याच्याटाक्यांना गळती लागल्यास त्यांची दुरुस्ती तत्काळ केली पाहिजे. ठरावीक कालावधीनंतर टाक्या धुतल्या पाहिजेत. अरुणशेटे, पाणीपुरवठ्याचे निवृत्त अधिकारी
पाण्याची क्षमता