आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 घरांत घुसले पाणी; नागरिक रात्रभर त्रस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक पाणी जपून वापरत आहेत. असे असताना जुळे सोलापूर येथील संप हाऊसमधील दगडी टाकी भरून वाहिल्याने 14 लाख लिटर पाणी वाया गेले. यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. दगडी टाकी ओव्हल-फ्लो झाल्याने मंगळवारी पहाटे 1 ते 4 वाजेपर्यंत 30 इंची पाइपलाइनमधून सुमारे 14 लाख लिटर पाणी 150 घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांना रात्रभर पाण्यात उभे राहावे लागले. संप हाऊस येथे कर्मचारी नसल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत गेले. पहाटे शहरासाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर ओव्हर-फ्लो झालेले पाणी वाहणे थांबले.

सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातून जुळे सोलापुरातील संप हाऊस येथे पाणीपुरवठा केला जातो. संप हाऊस ओव्हर-फ्लो झाल्याने मॉडेल कॉलनी, लक्ष्मी बँक कॉलनी, पद्मजा पार्क परिसरातून पाणी वाहत गेले. पाण्याला गती असल्याने रस्त्यावरील मुरूम वाहून गेला त्यामुळे खडी बाहेर येऊन रस्ता खराब झाला. नवीन बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेले 50 पोते सिमेंट भिजून खराब झाले.

सुमारे 12 लाख लिटर पाणी वाया गेले
430 इंची पाइपलाइनमधून सुमारे 12 लाख लिटर पाणी वाया गेले. ओव्हर-फ्लोची माहिती सोरेगाव पंप हाऊसला देण्याची जबाबदारी तेथील कर्मचार्‍याची असते. याबाबत अहवाल मागवून कारवाई केली जाईल. पाणी ओव्हरफ्लो होणे हे चुकीचेच आहे. त्याची कारणे शोधली जाणार आहेत. बी. एस. आहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता

घरात गाळ साचला
पाणी घरात शिरल्याने पाण्याच्या प्रेशरमुळे रस्त्यावरील माती घरात शिरली. अंगणात माती साचली. गेटमधून पाणी आल्याने रात्रभर पाणी काढावे लागले. भागिरथी बिराजदार, नागरिक

सुरक्षा रक्षक नाही
पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली. मात्र, तो सात वर्षांपासून नुसत्या सह्या मारून वेतन घेतो. हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. नूतन आयुक्तांनी अशा कर्मचार्‍यांचा बंदोबस्त करावा. नागेश ताकमोगे, नगरसेवक