आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाअधिवेशन: कर्ज अन् भ्रष्टाचारापासून महावितरणला मुक्ती देऊ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एकेकाळी महाराष्ट्र वीजनिर्मितीमध्ये आघाडीवर होता. इतर राज्यांना वीज देण्यात येत होती. परंतु सध्या स्थिती बदलली आहे. इतर राज्यांकडून वीज घेण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचार आणि कर्जामुळे वीज विभागाची व्यवस्था बिघडत गेली. येणाऱ्या काळात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न राहील. वीज महावितरणला भ्रष्टाचार आणि कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाचे सतरावे महाअधिवेशन सोमवारी सोलापुरातील नॉर्थ कोट मैदानावर झाले. अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ऊर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार दिलीप सोपल, बबनराव शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी केले.

ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, “सलग १८ तास जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.राज्यात काही ठिकाणी पाणी आहे, परंतु वीज नाही, अशी स्थिती आहे. राज्यात तीन लाख कुटुंबं वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखणे, राज्यातील सर्व घटकांपर्यंत वेळेत वीज कनेक्शन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पन्नास वर्षांची तुलना पाच वर्षांशी करू नये.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पुरी यांनी केले. शेवटी एन. के. मगर यांनी आभार मानले.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या १७ व्या महाअधिवेशनाचे उद््घाटन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार नारायण पाटील, वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कामगारांच्या मागण्यांचा विचार करणार
यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कामगारांनी मांडलेल्या मागण्या निश्चित रास्त आहेत. त्या सोडवण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन श्री. बावनकुळे यांनी दिले. कामगार, अधिकारी आणि पदाधिकारी असेे एक कुटुंब आहे. सर्वांनी एकत्र येऊन वीज विभाग कर्ज भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. एकदा घर मजबूत झाले की सर्व समस्या सुटतील, असेही ते म्हणाले.
उत्तम दर्जाचे ट्रान्स्फॉर्मर बसवणार
येत्या काळात उत्तम दर्जाचे ट्रान्स्फॉर्मर बसवून विजेचा भार कमी करणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले. माझ्या नावाने पैसे घेत असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. पैसे मागितल्यास तक्रार करा, थेट फौजदारी दाखल करू, असेही ते म्हणाले.
सर्व घटकांपर्यंत वीज पोहोचवा : बागडे
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, “समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत वीज पोहोचायला हवी. ट्रान्स्फार्मर बदलण्याचा निर्णय उत्तम आहे. सर्व शेतकऱ्यांना वीज दिली जाईल.
बातम्या आणखी आहेत...