आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसम बदलाचा परिणाम होतोय फळांच्या किमतीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजारपेठेत थंडीच्या मोसमातील फळांची आवक झाली आहे. बोरे, आवळा, पेरू, सीताफळ, अंजीर, मोसंबी आदी फळपिकांना पावसाळ्यात फुलोरा लागतो. नोव्हेंबरमध्ये ही फळे बाजारपेठेत दाखल होतात; पण यंदा ऐन फुलोर्‍याच्या काळात ढगाळ वातावरण व तापमानातील अनपेक्षित बदल या सर्वांचा फळपिकांवर मोठा दुष्परिणाम झाला आहे. फळांच्या किमतीत चढउतार असल्याचे चित्र आहे.

सफरचंद आणि डाळिंबाचे दर उतरले आहेत. मागील आठवड्यात 120 रुपये किलो असणारे सफरचंद सध्या 80 रुपयांना तर डाळिंबही 70 वरून 40 ते 50 रुपयांवर आले आहेत. बाजारात विविध प्रकारची बोरे आलेली असून काशीबोरे आणि गोटी बोरांचे प्रमाण जास्त आहे. प्रतिकिलो 20 ते 40 रुपये दराने यांची विक्री होत आहे. अनुकूल वातावरण नसल्याने आवक कमी असून केळी किरकोळ प्रति डझनास 25 ते 30 रुपये आहे.
चढउतार आहे
बाजार समितीमध्ये विविध फळांची आवक होत आहे. काहींचे स्थिर तर काहींचे वाढलेले आहेत. डाळिंब व सफरचंदाची आवक जास्त आहे.
- धनराज कमलापुरे, सचिव, बाजार समिती