आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Ceremony Issue At Solapur, Divya Marathi

लोकमंगल परिवारचा विवाह सोहळा उत्साहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने रविवारी बीबीदारफळ येथे लोकमंगल कर्मचारी विवाह सोहळ्यात दहा जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. या सोहळ्यात लोकमंगल समूहातील कर्मचारी, त्यांच्या मुला-मुलींचे, त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या भाऊ-बहिणींचे लग्न लावण्यात येते. वधू-वरांना हळदी व लग्नाचे कपडे, मणिमंगळसूत्र, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी अशा सर्व वस्तू लोकमंगल फाउंडेशनमार्फत देण्यात आल्या.

वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ‘लोकमंगल’चे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख, स्मिता देशमुख, रोहन देशमुख, प्रतिभा साठे, विजय जाधव, अविनाश महागावकर, लोकमंगल कारखान्याचे रविकांत पाटील आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.