आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण अहवाल: 13 विहिरींवर केला जाणारा खर्च लाखांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- चालू वर्षाचा उन्हाळा परतीला आला तरीही शहरातील विहिरींचे पाणी नागरिकांसाठी वापरात आणण्याच्या टेंडर प्रक्रियेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. मागील वर्षी पाणी उपशासाठी उपयुक्त विहिरींच्या सर्वेक्षणाच्या सुरू झालेल्या चर्चेनुसार यंदा सर्वेक्षणावर सुमारे 16 लाख रुपये खर्च केले. एवढा खर्च केल्यानंतर शहरात 13 विहिरी पाणी उपशास योग्य असल्याची माहिती महापालिकेच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे 32 विहिरी बुजलेल्या, 73 विहिरींचे पाणी आटलेले अन् 2 विहिरीच हरविल्या असल्याची नोंद अहवालात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात टँकरने पाण्यावर लाखो रुपये खर्च करणारी सोलापूर एकमेव महापालिका आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये खासगी व सार्वजनिक स्थळी असलेल्या विहिरींमधील पाण्याचा सार्वजनिक पाणीपुरवठय़ासाठी कसा उपयोग करता येईल, याची मागील वर्षी चर्चा सुरू झाली. शहरातील 134 विहिरींचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपाने कोल्हापूरच्या व्हीनस इंजिनिअर्स अँण्ड इंजिनियर्स या एजन्सीची नियुक्ती केली होती.

उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी हा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात होते. उन्हाळा परतीला लागला तरी अजून विहिरींमधील पाणी उपशाची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरूच आहे. विहिरींच्या सर्वेक्षणाचा अहवाल एजन्सीने 8 मार्च 2013 रोजी मनपाला दिलेला आहे. या विहिरीतून पाणी उपशासाठी चार कोटी 40 लाख 19 हजार 645 रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या कामाच्या टेंडरिंगचा विषय सभागृहासमोर पाठविलेला आहे.


विहिरी उपशांसाठी टेंडरचे गुर्‍हाळच
13 विहिरींमधील गाळ काढण्यासाठी मनपाकडून टेंडर प्रक्रिया सुरू आहे. दोनदा निविदा काढल्या पण मक्तेदार पुढे येत नाहीत. त्यामुळे पुन्हा टेंडर काढले जाईल.
- बी. एस. आहिरे, सार्वजनिक आरोग्य अभियंता

टेंडरसाठी पुढे येईना
ही योजना करण्यासाठी महापालिकेचे 4 कोटी 20 लाख रुपये खर्च होणार आहेत. तरी प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळेल की नाही यांची शंका आहे. उन्हाळा एक महिना आहे. आता टेंडर दिले तर एक महिन्यात 13 विहिरींचे काम होणे अशक्य आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात या योजनेचा फायदा नागरिकांना होणे अशक्य आहे.

प्रत्यक्ष फायदा पावसाळ्यात
हद्दवाढ भागात प्राधान्य द्या असे अहवालात नमूद करण्यात आले. त्यानुसार 32 विहिरींची यादी तयार करण्यात आली. प्रत्यक्षात शहरातील विहिरींची संख्या जास्त आहे.

योजना हद्दवाढ भागात राबवा
प्रभाग 17: विडी घरकुल एबी ग्रुप (44.83 लाख)
प्रभाग 28: लक्ष्मी-विष्णू चाळ ते रामवाडी (36.91)
प्रभाग 7: चंडक बगिचा बुधवार पेठ (35.19)
प्रभाग 31: मौलाली बावडी (39.89)
प्रभाग 24: सुभाष उद्यान (33.96)
प्रभाग 1: रूपाभवानी मंदिर उद्यान (2.33)
प्रभाग 30: रेवणसिध्देश्वर नगर (37.10)
प्रभाग 15: साखर पेठ शॉपिंग सेंटर (31.98)
प्रभाग 10: देगांव जिल्हा परिषद शाळा (36.44)
प्रभाग 33: लष्कर पारशी विहीर (35.15)
प्रभाग 11 :गढ कॉलनी (32.18)
प्रभाग 6 :जय भवानी बाग (36.67)
प्रभाग 2: धोत्रीकर वस्ती साकळी विहीर (37.52)