आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांच्या वैचारिक लढ्याची गाथा \'व्हॉट अबाऊट सावरकर\', एका तेजस्वी पर्वाची कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - क्रांतिकारक,समाजसुधारक, हिंदूसंघटक, ज्वलंत साहित्यिक-महाकवी, भाषाप्रभू अशा अनेकविध पैलूंनी भारतीय समाजमन ढवळून काढणारे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांचे विचार हे आजच्या काळाशीही तितकेच साधर्म्य सांगणारे आहेत. त्यांच्या जाज्वल्य विचारांची आणि वैचारिक लढ्याची गाथा लवकरच रूपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की, याची कथा लिहिणारे लेखक आहेत सोलापूरचे. त्यांचे नाव युवराज नरुटे.

जुळे सोलापूर परिसरात राहणारे नरुटे हे मागील अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांसाठी लेखन करतात. या चित्रपटासाठीही त्यांनी सहलेखन केलेले आहे. रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित आणि रुपेश कटारे, नितीन गावडे दिग्दर्शित "व्हॉट अबाऊट सावरकर?' येत्या १७ एप्रिलला राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

सावरकरांचे देशप्रेम, त्यांचे विचार भावी पिढीला समजायला हवेत. त्यांचे विचार आजच्या तरुणांनी मनात रुजवायला हवेत यासाठी सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या एका ध्येयवेड्या तरुणाची कथा यात रेखाटण्यात आली आहे.

अशी आहे चित्रपटाची कथा
श्रीकांतभिडे हा चित्रपटात आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतो. अन्यायाविरुद्ध लढताना सावरकरांच्या कार्याने प्रेरित अभिमान, घुसमट त्या विरोधात आवाज उठवण्याची त्याची प्रखर तडफ हे मानसिक द्वंद्व त्याने खुबीने सादर केले आहे.

भूमिकागीते : शरदपोंक्षे, अविनाश नारकर, विवेक लागू, अतुल तोडणकर, श्रीकांत भिडे, सारा श्रवण आदींच्या भूमिका आहेत. अभिषेक शिंदे आणि अवधूत गुप्तेंच्या संगीताने सजलेल्या चित्रपटात गीते असून ती अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

संवादात आक्रमकता
शाळेतधडा होता. महाविद्यालयीन काळात सावरकर वाचले होते. लिखाणासाठी पुन्हा वाचावे लागले. सावरकरांचे देशसेवेत मोठे योगदान आहेच. सशस्त्र क्रांतीत त्यांचे योगदान मोठे आहे. एक छोटा प्रयत्न केला आहे. मुख्य काम संवादात आक्रमकता आणणे हे केले आहे.
- युवराज नरुटे, लेखक