आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडीपेन्डन्स... व्हॉट इज इंडीपेन्डन्स?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ ऑगस्टला आपला हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारीला घटना अस्तित्वात येऊन प्रजेच्या हाती राज्य आलं. पण खरं पाहता खरेच प्रजासत्ताक राज्यांची संकल्पना रुजली आहे का? जर असेल तर अजूनही प्रजेच्या हिताचे प्रश्न का प्रलंबित आहेत? याकडे कुणी गांभीर्याने पाहणार आहे की नाही? अशा एक ना अनेक प्रश्नांचा काहूर तरुणाईच्या मनात आहे. ते म्हणतात इंडीपेन्डन्स... व्हॉट इज इंडीपेन्डन्स? व्यू आर डिपेंडेड, नॉट इंडीपेंडेड. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाईशी साधलेला हा संवाद. तरुणाईला सर्वत्र शांतता, आनंद जिव्हाळा हवा आहे. कोणाचेही कोणापासून अडू नये, इतकी सोय प्रशासन शासनाने पुरवावी. ज्यामुळे सर्वत्र सुजलाम सुफलामता येईल. भ्रष्टाचार रोखून सरळमार्गाने कामे पार पडावीत. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. कायदे अजून कडक व्हावेत अशा अनेक गोष्टींबद्दल तरुणाई विचार करते आहे. पण याला मूर्तरूप येण्यासाठी देशाच्या कायद्यात आमूलाग्र बदल त्यांना हवे आहेत. जरी ते शक्य नसले तरी आहे त्या कायद्यांचे कठोरतेने पालन तरी व्हावे, अशी तरुणाईची इच्छा आहे.

*आम आदमीच्याहाती सत्ताकेंद्रे येणे गरजेचे आहे. लोकशाही प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे.
पश्चिम मंगळवार पेठेतील शिवगंगा अपार्टमेंट परिसरातील तरुणाईने यंदाचा प्रजासत्ताक दिन स्वनिर्मित राष्ट्रध्वजाने साजरा करण्याचे ठरविले आहे.

*कोणताही कायदाहोताना जनसामान्यांच्या प्रतिक्रिया मागवणे गरजेचे आहे.
*पाणी, वीजसुरक्षा याबद्दल गांभीर्य हवे.
*तसा सजेशनबॉक्स गावागावात असावा.
*कोणताही निर्णयघेताना सामान्यांना विचारावे.
*समान नागरीकायदा केलाच पाहिजे.
*अँटी करप्शनपोलिसांचा मोठा रोल आवश्यक.
*मंत्रिमंडळात जनसामान्यांच्याहिताची धोरणे पास व्हावीत.
*भ्रष्टाचार रोखण्यातसरकारचे कठोर नियम हवेत.
*एकंदर सर्वचराजकारणात पिढी-परंपरा नको.
तरुणाईला हे आहे अपेक्षित
तरच सुजलाम सुफ
लाम
-राजकारण्यांनीसत्ताकेंद्रे आपल्या हाती घेऊन देशात अराजकता माजविण्यास खतपाणी घातले आहे. त्यासाठी आम आदमीच्या हाती सत्ताकेंद्रे येणे गरजेचे आहे. लोकशाही प्रत्यक्षात उतरण्यासाठी बरेच गरजा आवश्यक आहेत. ते झाले तर सर्व सुजलाम सुफलाम होईल, यात शंका नाही. केवळ देशभक्तिपर गीते वाजवून देशप्रेम आहे हे सिद्ध होत नाही.'' प्राजक्तायेमूल, जुना वालचंद कॉलेजजवळ

भ्रष्टाचार हेच मूळ कारण
-देशाचाविकास व्हायचा असेल तर तेथून पूर्णत: भ्रष्टाचार निर्मूलन होणे गरजेचे असते. आपल्या देशात प्रचंड भ्रष्टाचार असून त्यामुळे विकासाच्या कक्षा खुंटल्या आहेत. खरे प्रजासत्ताक राज्य हवे असेल तर युवकांच्या हाती सत्ता द्यावी. तेव्हाच या देशात खऱ्याअर्थाने प्रजासत्ताक राज्य येईल असा माझा पूर्ण विश्वास आहे.'' सौंदर्याआडम, अक्कलकोट रोड, एमआयडीसी

मानसिकता बदला
-प्रजासत्ताकराज्य म्हणून नावालाच आहे. प्रत्यक्षात यात बऱ्याच त्रुटी आणि मायनस पॉइंट आहेत. खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राज्य आणावयाचे असेल तर आपल्यासह प्रत्येक व्यक्तीची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तेव्हाच सकारात्मकता येईल. यासाठी याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. तेव्हाच हे शक्य आहे.'' ऐश्वर्यानळेगावकर, होटगी नाका

जातीपातीच्या भिंती पाडा
-सध्याकेवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात जातीय अराजकता वाढली आहे. यासाठी जातीपातीच्या भिंती पाडणे गरजेचे आहे. याशिवाय विकास साधता येणार नाही, आणि प्रजासत्ताक राज्य निर्माणही होणार नाही. झेंडावंदन, देशभक्तिपर गाणे वाजविणे हा ट्रेंड बनलाय.'' संकेत कुलकर्णी, राजस्वनगर

आय डोंट थिंक सो
-सध्याजे काही सुरू आहे ते ऑल इज वेल असेही नाही आणि नावलौकीक वाढेल असेही. पण आपण सध्या २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट याकडे केवळ एक नॅशनल हॉलिडे म्हणून पाहत आहोत; पण याचा खरा अर्थ अजून उमजणे बाकी आहे. त्यासाठी बऱ्याच सुधारणा आवश्यक आहेत, त्या व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.'' उजमाशेख, लष्कर

सत्ता आली प्रजेची नाही....
-प्रजासत्ताकलोकशाही मान्य करण्याचा हा दिवस. खरंच व्यक्ती स्वतंत्र झाला आहे का? स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार वाढतच आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य दडपून टाकण्याच्या हिंसक मार्गाचा वापर यामुळे प्रजासत्ताक राज्य येऊनही आल्यासारखेच आहे. बदल हवा आहे.'' अक्षयकट्टी, लकी चौक