आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.... रिक्षाचालकांनी करायचे काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केवळ एका फोनवर आेला टॅक्सी दारासमोर उभी राहते. प्रवाशांना शहरातील प्रत्येक ठिकाणी घेऊ जाते. मग रिक्षावाल्यांनी करायचे काय? त्यांच्या उपजीविकेचे साधनच मोडून टाकल्यानंतर त्यांनी जगायचे कसे? टॅक्सीची सेवा शहराबाहेर असावी. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी त्याची संकल्पना आहे. पण शहरांतर्गतच सेवा सुरू झाल्याने रिक्षाचालकांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याच्या विरोधात ३० एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षाचालकांचा प्रचंड मोर्चा घेऊन जाणार असल्याची माहिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम यांनी दिली.

शहरात आेला टॅक्सीची सेवा सुरू झाली. त्यामुळे रिक्षाचालक िंचंतेत पडले. त्यांच्या उपजीविकेवरच घाला घालण्याचा हा घाट आहे. तो हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन असल्याचेही श्री. आडम यांनी स्पष्ट केले. महानगरांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात टॅक्सी सुविधा देण्यात आली. त्यासाठी शहरांतर्गत रस्ते मजबूत केले. सोलापुरात अशी परिस्थिती नाही. प्रमुख चौक आणि मार्गांवर वाहतुकीची नेहमी कोंडी होते. वाहतूक व्यवस्था बळकट नाही. अशा स्थितीत टॅक्सी आणून काय करणार? आधीच १० हजार रिक्षाचालक असताना, त्यात टॅक्सीचालकांची भर कशाला? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

आज पुण्यात बैठक
रिक्षाचालकांचेआंदोलन राज्यभर पेटवण्यासाठी रविवारी सकाळी पुण्यात बैठक अायोजित केली अाहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. तीत टॅक्सीसेवेला विरोध, रिक्षाचालकांचा संप आदी विषयावर चर्चा होणार आहे. त्यासाठी श्री. आडम शनिवारी पुण्याला रवाना झाले.

अनामत नाही,
सेवा मात्र सुरू
महानगरांमध्येपर्यटकांच्या सेवेसाठीच आेला टॅक्सीला परवानगी देण्यात आली. हा परवाना देताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे अनामत रक्कम ठेवावी लागते. ‘अ’ वर्ग महानगरांसाठी कोटी तर ‘ब’ वर्गातील नगरांसाठी ५० लाखांची अनामत रक्कम आहे. अशी कुठलीच अनामत घेता सोलापुरात आेला टॅक्सी सुरू करण्यात आल्या. त्यांनी शहरांतर्गत सेवाही सुरू केली. ही बाबच बेकायदेशीर आहे.” सलीममुल्ला, सचिव,लालबावटा रिक्षाचालक संघटना