आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओत परवाना देताना आली पारदर्शकता, पण गती मंदावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कामात पारदर्शकता, भ्रष्टाचाराला आळा बसवा म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने सप्टेंबर २०१४ पासून वाहन परवान्यासाठी राज्यभरात ऑनलाइन पद्धत लागू केली. नवीन पद्धतीमुळे वाहन परवान्यात पारदर्शकता आली खरी, पण वाहन परवान्याच्या वितरणावर याचा विपरित परिणाम झाला. ऑनलाइन यंत्रणा असून अडचण आणि नसून खोळंबा, असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ‘डीबी स्टार’ने या विषयावर टाकलेला प्रकाश....
पूर्वी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून रोज सुमारे ३०० ते ४०० वाहन परवाने दिला जात होते. परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे रोज केवळ १६० जणांनाच परवाना दिला जात आहे. परवान्यासाठी अपाॅइमेन्ट घेण्याची १६० ची मर्यादा असल्याने आता वाहन परवान्यासाठी दोन महिन्यांचे म्हणजेच जूनपर्यंतचे ऑनलाइन बुकिंग झाले आहे. त्यामुळे परवाना काढण्यासाठी वाहनधारकांना वेटिंग करावे लागत आहे. दुसरीकडे वाहन परवाना नाही म्हणून वाहतूक पोलिस रोज साधारणत: पन्नास ते शंभर वाहनधारकांवर कारवाई करतात. आरटीओच्या या वेळखाऊ पद्धतीमुळे ज्यांना परवाना हवाय त्यांना मिळत नाही. नवीन पद्धतीमुळे वाहनधारक वैतागले आहेत.
शिकाऊ पक्क्या वाहन परवान्यासाठी www.sarthi.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अपाॅइमेन्ट घेता येते. अथवा www.mahatranscom.in येथे भेट द्यावी.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा, वाहनधारक वैतागले...