आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विमानतळाच्या जमिनीची मालकी कोणाकडे? , संबंधित मात्र फाईल गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - होटगी रस्त्यावरील विमानतळाच्या जमिनीवर शासनाचे नावच नव्हते. काही वर्षांपूर्वी ते लावण्याचे प्रयत्न झाले; परंतु त्याची फाइल अद्याप सापडत नाही. शेवटी मालकी हक्क बाजूला ठेवून या विमानतळाचा विकास करावा, असे लेखी पत्र दिले. महसूल खात्याच्या या कारभारामुळेच विमानतळाचा विकास झाला नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी सांगितले.

महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांवर सायंकाळी बहुउद्देशीय कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. मागण्या करताना कर्तव्याच्या कसोटीत कसे उतरले पाहिजे, याबाबतच्या सूचना त्यांनी केल्या. सोलापूरच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना शासन निर्णय कळत नाही, समजूनही घेत नाहीत. त्यामुळे अनेक चुका होतात. त्याने अनेक घोटाळे होऊ शकले असते. परंतु, संबंधित कागदपत्रांची मी पडताळणी केली. त्यात प्रत्यक्ष त्या कर्मचार्‍याचा अज्ञानपणा दिसून आला. पण त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ते कळणे अपेक्षित होते. अशा प्रकरणांत कर्मचार्‍यांवर कारवाई केली नाही. कुठल्याही प्रकरणात लगेच बदली, कारवाई याच्या विरोधात मी आहे. चौकशी करूनच ही प्रक्रिया व्हावी, अशा सूचना देत असतो, असे श्री. गेडाम यांनी स्पष्ट केले.

गेडाम म्हणतात..
1. कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य; परंतु कामात तडजोड नाही
2. ज्यासाठी नियुक्ती आहे, त्यात कौशल्ये मिळवली पाहिजेत
3. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून कामे टाळण्याचा प्रयत्न नको
4. वाळू तस्करांना आपणच मोठे करतो; दूर करण्याचेही शिका
5. दलालांमार्फत दाखले देव-घेवीचे काम त्वरित थांबवा
6. पोलिस आणि महसूल खाते सर्वात बदनाम, प्रतिमा सुधारा


खात्याचे नाक कापले गेले !
केंद्रीय राखीव पोलिस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र सोलापूरला होणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतीच संयुक्त बैठक घेतली. त्यांच्या समोर सोलापूरच्या जागेचे सादरीकरण (पॉवर प्रेझेंटेशन) करायचे होते. त्याचे काम एका कर्मचार्‍याला शिकवले. त्याला माझा लॅपटॉप दिला. प्रत्यक्ष बैठकीत झाले काय? महसूल खात्याचे अक्षरश: नाक कापले गेले. त्या दिवशी मी खूप अस्वस्थ होतो, असेही श्री. गेडाम म्हणाले.

या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. परंतु, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक काकडे नव्हते. श्री. गेडाम यांनी कर्मचार्‍यांना विश्वासात घेताना, एक मोठी कारवाई केल्याचे सूतोवाच केले. माढय़ात एका शेतकर्‍याचे काम किरकोळ कारणावरून अडवून ठेवले. गेल्या चार वर्षांपासून हा शेतकरी फिरतो आहे. नागरिकांच्या कामाशी आपण बांधील आहोत, हे विसरणार्‍या अधिकार्‍यावर मी मोठी कारवाई केली, असे श्री. गेडाम म्हणाले.