आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Stablisation Delayed?; Water Expert Anil Patil Question

.. तर स्थिरीकरण का रखडले? ; जलतज्ज्ञ अनिल पाटील यांचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला अजित पवार यांनी मंजुरी दिली होती तर त्यांनी या योजनेला विरोध का केला? गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात या योजनेला पाठिंबा देणारी एक चळवळ उभी रहात आहे. तरीही योजना का रखडली, असा सवाल जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे काँग्रेस शहर आणि जिल्हाध्यक्षांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही योजना अजित पवारांचीच आहे, पवारांचा या योजनेला विरोध नाही’ असे स्पष्टीकरण दिले होते. याबद्दल पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, की स्थिरीकरणाला शरद पवार व अजित पवार यांचा पाठिंबा असताना योजना रखडली. यात सर्व उत्तर मिळते. 2 नोव्हेंबर 2010 रोजी शेळवे येथे झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी ‘ही कदापि न होणारी योजना आहे’ असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य खोटे असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिध्द करावे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळेच पाण्याचे नियोजन बिघडले. जनता आता प्रक्षुब्ध झाली आहे. ‘कृष्णा-भीमा’साठी सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. या गोष्टी ओळखूनच अजित पवारांनी आपल्या सर्मथकांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले असावे.


मोहिते-पाटलांनी आता थांबू नये
स्थिरीकरणासाठी ज्यांनी सह्यांची मोहिम सुरू केली त्यांनी आता पवारांच्या दबावतंत्राला, भूलथापांना बळी न पडता या योजनेचे काम सुरू झाल्यानंतरच थांबावे, असे आवाहन पाटील यांनी केले. भाजपा-सेना युतीने त्यांना पाठिंबा दिलेलाच आहे. सोलापूर जिल्ह्यातील जनताही त्यांच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.


अनिल पाटील यांचे सवाल
०माढा लोकसभेतून नेतृत्व करणा-या पवारांनी अद्यापही यासंदर्भात जाहीर भूमिका का घेतली नाही?
० गेल्या दोन वर्षांपासून पवार काका-पुतण्यांकडून या योजनेची हेटाळणी का झाली?
० पवार समर्थकांनी जाहीरपणे या योजनेला पाठिंबा का दिला नाही ?