आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wife Killer To Jail Of Life Imprisonment At Solapur Court Decision

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: अनैतिक संबंधास आड येणार्‍या पत्नीस गणपती पाहण्यास जाऊ असे बहाणा करून तिचा खून करणारा पती दादाराव नवनाथ सातव (24, रा. चौबे पिंपरी, ता. माढा) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. वडाळी यांनी जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी ठोठावली.
दादाराव सातव याचे एका महिलेशी अनैतिक सबंध होते. त्यास पत्नी रेखा दादाराव सातव ही विरोध करीत होती. सहा सप्टेंबर 2008 रोजी दादाराव याने पत्नी रेखा हिला पुण्याला गणपती पाहण्यास जाऊ, असे बहाणा करून मोटारसायकलवर माढा तालुक्यातील ढवळस शिवारातील भीमा-सीना जोडकालव्यावरील विहीर क्रमांक चार येथे आणले. रेखा हीस बोगद्यात ढकलून दिले. तिने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी तिला बाहेर काढले. शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी आणत असताना रस्त्यात ती मरण पावली. त्यापूर्वी तिने पोलिसांना मृत्यूपूर्व जबाब दिला.
सरकारच्या वतीने 16 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार पत्नीचा खून केल्याप्रकरणी दादाराव सातव यास न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे अँड. इनायतअली शेख, आरोपीच्या वतीने अँड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले.