आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा गळा दाबून खून, पती ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- घरगुती कारणावरून पतीने पत्नीचा गळा दाबला, विटाने मारहाण करून खून केल्याची घटना सलगरवस्ती हद्दीतील भैरववस्ती येथे घडली. याबाबत सलगरवस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती महेश बाबर (वय 22, रा. भैरववस्ती) हिचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. परंतु, ती पतीबरोबर दीडच महिने राहिली. नंतर प्रेमसंबंधामुळे महेश बाबर सोबत राहू लागली. त्यांना एक वर्षाची मुलगी आणि दोन महिन्याचा मुलगा आहे. घरगुती कारणावरून स्वाती आणि महेशमध्ये नेहमी भांडण व्हायचे. हे दोघे भैरव वस्तीमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. 18 एप्रिल रोजी त्या घरमालकीनेने घरात स्वातीचा मृतदेह पाहिला आणि पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महेश बाबर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. घरगुती कारणावरून त्याने गळा दाबून आणि विटाने चेहर्‍यावर मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन भावंडांमध्ये हाणामारी
वडिलांना का मारले, असा जाब विचारण्यास गेलेल्या भावाला सख्ख्या भावानेच लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना 18 एप्रिल रोजी घडली. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.दिनेश शिवलाल घोडके याने स्वत:च्याच भावास जाब विचारला आणि विलास शिवलाल घोडके याच्यासह तिघांनी मिळून दिनेश यास लाथाबुक्याने मारहाण केली तसेच ब्लेडनेही मारले. यामध्ये तो जखमी झाला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटीच्या धडकेने, युवकाचा मृत्यू
मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने विनायक लक्ष्मण अकेले (वय 35, रा. तुळजापूरवेस, दाळगे प्लॉट) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौकात घडली. अकेले हे मोटारसायकलवरून (एमचएच 13 एटी 0573) अक्कलकोट येथून सोलापूरकडे येत होते. यावेळी कर्नाटक एसटी (केए 36 एफ 1077)ने ओव्हरटेक करताना त्यांना पाठीमागून धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिद्धाराम मलकप्पा मानवी (वय 52, भवानी पेठ, दाळगे प्लॉट) यांनी जेलरोड पोलिसात फिर्याद दिली. एसटीचालक चंद्रशा नागप्पा बंगरगी (वय 40, धत्तुरगाव, ता. आळंद) यास अटक केली असून हवालदार आनंद कवळस तपास करीत आहेत.