आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर रेल्वे स्थानकावर लवकरच 'वायफाय' सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेस्थानकावर गाडीची वाट पाहण्यात वेळ घालवता तुम्ही आपल्या लॅपटॉपवर आता महत्त्वाची कामे करू शकणार आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने देशातील प्रमुख रेल्वे स्थानकावर(ए- वन दर्जा) वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील स्थानकापासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावरही लवकरच ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा देण्याची मागणी खूप दिवसांपासून प्रलंिबत होती. रेल्वे अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर नुकताच वायफाय सुविधेबाबत रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. देशातील निवडक रेल्वे स्थानकांवर या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्याने याचा विस्तार प्रमुख रेल्वे स्थानकावर केला जाणार आहे. ऑक्टोबरपासून नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. येत्या काही दिवसांत सोलापूर रेल्वे स्थानकावरही वायफाय सुरू झाल्याचे दिसणार आहे.
सोलापुरातही सुविधा उपलब्ध होईल

देशातीलप्रमुख रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे विभागातील महत्त्वाचे स्थानक असून याठिकाणीही लवकरच ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी काही बाबींची पूर्तता होणे अपेक्षित आहे. नरेंद्रपाटील, मुख्यजनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे मुंबई.