आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Liquor Shops, Hotels Will Remain Open Till Late 31st Dec.

‘थर्टी फर्स्ट’ला बार पहाटेपर्यंत खुले ठेवणे, मंत्री महोदयांना नाही पटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - एकीकडे तरुणपिढी सुधारावी, यासाठी प्रयत्न सुरू असताना राज्याच्या गृहमंत्रालयाने 31 डिसेंबर रोजी पहाटे पाचपर्यंत राज्यातील बिअर बार आणि परमीट रुम उघडे ठेवण्याबाबत घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे मत सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती आणि दारूबंदी प्रचारमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले.
खासगी दौर्‍यानिमित्त बुधवारी ते येथे आले होते. मोघे म्हणाले, गृहमंत्रालयाच्या निर्णयाने थर्टी फर्स्ट या दिवशी नागरिकांना पहाटे पाचपर्यंत दारू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तरुण पिढी सुधारावी यासाठी आमचे खाते दारूबंदी आणि व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करत आहे. अशाप्रसंगी राज्याच्या गृहविभागाने याच्या विरोधात निर्णय घेणे योग्य नाही. तरुण पिढी व्यवसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे प्रत्येक विभागाचे कर्तव्य आहे. दरम्यान शासनाने जादूटोणा विधेयक पारित करून महाराष्ट्र हे खरोखरच पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असल्याचेही ते म्हणाले.