आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीआयआय’च्या मानांकनात ‘डब्ल्यूआयटी’ देशात प्रथम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कौशल्यांना विस्तृत अवकाश मिळवून देणार्‍या सोलापूरच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या (डब्ल्यूआयटी) सिव्हिल इंजिनिअरिंग विभागास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. एआयसीटीई-सीआयआय या संस्थेने देशातील केवळ 8 महाविद्यालयांना ‘बेस्ट इंडस्ट्री लिंकड टेक्निकल इंन्स्टिट्यूट-2013’चे मानांकन दिले आहे.

तंत्रशिक्षण महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षण प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रासाठी किती पूरक आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्यात महाविद्यालयास कितपत यश मिळाले. ग्लोबल इंडस्ट्रीज व महाविद्यालय अभ्यासक्रम, शैक्षणिक सुविधा, मनुष्यबळ या सर्व घटकांचा विचार करून हे राष्ट्रीयस्तरावरील मानांकन दिले जाते. देशभरातून 1050 महाविद्यालये या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. देशभरातून 37 महाविद्यालयांची दुसर्‍या फेरीसाठी निवड झाली होती. प्रत्यक्ष मानांकन मिळालेल्या 8 संस्थांमध्ये सोलापूरच्या वालचंदने मानांकन मिळवून शैक्षणिक क्षेत्रातील लौकिक वाढविला आहे.

महाविद्यालयास हे मानांकन मिळाल्याने राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्लेसमेंटमध्ये समावून घेण्यास शक्य होणार आहे. डब्ल्यूआयटीने नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडेशनची (एनबीए) संकल्पना प्रत्यक्ष उतरवली आहे. देशातील आघाडीच्या कंपन्यांमधून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी प्लेसमेंट मिळते. संस्थेच्या लौकिकात या मानांकनामुळे भर पडली आहे. संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी, मानद सचिव डॉ. रणजित गांधी, प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे आदींचे पर्शिम यासाठी लाभले आहे.