आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Harassment Case In Solapur Govt. Medical Hospital

उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर केले दुष्कर्म, डॉक्टरला पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर एका डॉक्टराने दुष्कर्म केल्याची फिर्याद तरुणीने शुक्रवारी सदर बझार पोलिसात दिली आहे. पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. याप्रकरणी डॉ. मिलिंद मोहन सलगर (वय 29, रा. लक्ष्मी बंगला, विकासनगर, मूळगाव, भूम, ता. परंडा) यांना अटक झाली आहे.
10 ऑक्टोबर रोजी पीडित तरुणी तिच्या हनुवटीजवळील त्वचेवरील (काळा डाग पडला आहे) इलाजासाठी शासकीय रुग्णालयात गेली होती. त्वचारोग तज्ज डॉ. सलगर यांनी त्यावेळी विनयभंग केला. 19 ऑक्टोबर रोजी शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉकमधील ओपडी रूम नंबर 55 मध्ये दुष्कर्म केले. असाह्यतेचा फायदा घेऊन तसेच औषधोपचाराचे आमिष दाखवून हा प्रकार झाला आहे. 28 नोव्हेंबर रोजी मोबाइलवर अश्लील चित्रफीत पाठवून ती पाहण्याची सक्ती केली. शिवाय, कुणाला ही घटना सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधीक्षकांकडे दिली होती तक्रार
दोन दिवसांपूर्वी पीडित तरुणीने रुग्णालयाच्या अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दिला. पोलिसांत गुरुवारी रात्री फिर्याद नोंदण्यात आली. त्यानंतर रात्री साडेबाराला अटक झाली. दुपारी मुख्य न्यायदंडाधिकारी र्शीकांत भोसले यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर नऊ डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी देण्यात आली.