आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 महिन्यांच्या मुलीसह महिलेची आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कुमठानाका परिसरातील मार्कंडेयनगरात राहणार्‍या एका विवाहित महिलेने आपल्या सात महिन्यांच्या मुलीसह कंबर तलावात आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रूपाली प्रफुल्ल रणसिंग (वय 28), खुशी (वय सात महिने, रा. दोघे मार्कंडेयनगरात शिंदे यांच्या घरी भाड्याने राहात होते) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

रूपाली या पहाटे सहाच्या सुमारास खुशीला सोबत घेऊन घरातून निघून गेल्या. त्यांचे पती व पाच वर्षांचा मुलगा घरातच झोपले होते. सातच्या सुमाराला पती प्रफुल्ल यांना रूपाली या घरी नसल्याचे दिसले. भाऊ प्रमोद यांना त्यांनी माहिती दिली. नातेवाईक व शेजार्‍यांनी परिसरात शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. कंबर तलावाकडे पाहणी करताना तेथे जमलेली गर्दी पाहून नातेवाईक तिकडे गेले. त्यावेळी रूपाली व खुशबू यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. प्रमोद रणसिंग यांनी सदर बझार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. रूपाली यांचे पती खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात.

मानसिक तणावाखाली : रूपाली या मूळच्या दौंड येथील रहिवासी. त्यांच्या आई काही वर्षांपासून बेपत्ता आहेत. आईला शोधण्यासाठी गेलेला भाऊही गायबच आहे. याच मानसिक तणावाखाली रूपाली होत्या. अधूनमधून मनोरुग्णासारखे वागत होत्या, अशी माहिती समोर आल्याचे फौजदार गोविंद कदम यांनी सांगितले.