आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Torched Herself With Child And Committe Suicide

चिमुकलीसह पेटवून घेऊन महिलेची आत्महत्या; पैशांसाठी छळणा-या पतीला अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माहेराहून पैसे, दागिने आणावेत, यासाठी डॉक्टर पतीसह सासरच्यांकडून होणा-या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेने दीड वर्षाच्या मुलीसह पेटवून घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री नऊ वाजता शहरात ही घटना घडली.


डॉ. स्मिता उर्फ कांचन चनबसप्पा केसगौंड (वय 27), चिन्मयी केसगौंड या दोघींचा मृत्यू झाला. बापूगौडा पाटील यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. चनबसप्पा दर्गेप्पा केसगौंड याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. स्मिता व चनबसप्पा यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2010 रोजी झाला. दोघेही बीएएमएस. चनबसप्पा हे सिंदगी (कर्नाटक) येथे प्रॅक्टिस करतात तर स्मिता या सोलापुरातील खासगी रुग्णालयात काम करायच्या. मुलगी लहान असल्यामुळे काही महिन्यांपासून त्या कामावर जात नव्हत्या. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांना पतीकडून त्रास होता. माहेरहून कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावेत, यासाठी स्मिता यांचा छळ सुरू होता.


मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास सैफुल येथील त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजा-यांच्या निदर्शनास आले. त्यांनी केसगौंड यांच्या घराचा दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दार उघडून पाहिल्यानंतर स्मिता अणि चिन्मयी यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.