आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशमी साड्या लाडक्याच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नव्या फॅशनच्या नव्या नवलाईतही आपले स्थान अढळ ठेवणार्‍या रेशीमचे भाव हे सध्या वधारले असले तरी महिलांना उत्सवात रेशमी साड्या परिधान करण्याची हौस वाढत आहे. सण समारंभाला महिला व युवती या पारंपरिक पैठणी, कंची साड्यांना महत्त्व देताना पाहावयास मिळत आहे.

वर्कच्या साड्यांचे प्रस्थ
वर्कच्या विशेषत: नेटच्या साड्यांचे प्रस्थ हे गेल्या तीन वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. 200 ते 80 हजार रुपयांपर्यंत मिळणार्‍या या साड्यांना मोठय़ा प्रमाणावर मागणी असली तरी या साड्या महिला ठरावीक समारंभ आणि पार्टीच्या वेळी वापरतात. दिवाळी, दसरा अशा उत्सवांसाठी पैठणी आणि रेशमी साड्यांना मागणी असते.

बॉक्स पैठणीला मागणी
रेशमी साड्यांतील बॉक्स पैठणी साडीला यंदा खूप मागणी आहे. कमीत कमी ही साडी 18 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे बॉर्डर पहिल्यांदाच मीना वर्कने सजवण्यात आली आहे यात फिरत्या रंगाला अधिक मागणी आहे.

बांबू कतान लाडकी
रेशमी साड्यात उत्तम रंग आणि नक्षी असलेली ही साडी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असल्याने महिलांची अधिक पसंती आहे. यात मोठय़ा प्रमाणावर रंग उपलब्ध आहेत.

दिवाळीच्या वर्क साड्यांचा खजाना
वर्कच्या कुन्दन वर्क नेट, टिकल्या वर्क, लेख वर्क, पॅच वर्क, वेलवेट बॉर्डर, मणी वर्क, जरदोसी वर्क, टाका वर्क, एम्ब्रॉयडरी वर्क अशा साड्यांचा खजिना बाजारात आला आहे.

रेशीमचे स्थान अढळ
लग्न, सण समारंभ, धार्मिक विधींना महिला रेशमी साड्यांना पसंती देतात. पैठणीचा नंबर पहिला आहे. दुसरा कंची आणि इतरमध्ये विविध प्रकारच्या रेशमी साड्यांना आहे. ’’ केशव चाटला, संचालक, चाटला साडी सेंटर