आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेसाठी गेलेली महिला रेल्वेच्या धडकेने ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवमीमहाळची पूजा करण्यासाठी संभाजी तलावाजवळ गेलेली महिला रेल्वेच्या धडकेने मरण पावली. हा अपघात पाहून त्यांच्या सोबत आलेल्या इतर महिला त्यांना पाहण्यासाठी धावत जाताना खडीवरून पाय घसरून पडल्या. या अपघातात तीन महिला जखमी झाल्या आहेत.

ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमाराला घडली. उमाबाई गुलजार शिवसिंगवाले (वय ५८, रा. उत्तर कसबा, जुनी तालीमजवळ) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रेखा बलदेव धनेवाले (वय ३५, रा. बापूजीनगर), मीरा जयसिंग बराणपुरे (वय ३०, रा. लोधीगल्ली), पुन्नूबाई लक्ष्मणसिंग मनसावाले (वय ३५, रा. लोधीगल्ली) या तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेखा यांची प्रकृती गंभीर असून, त्या बेशुद्ध आहेत. नवमी महाळची पूजा करण्यासाठी लोधी गल्लीतील काही महिला संभाजी तलावाजवळ गेल्या होत्या. आठच्या सुमारास रेल्वेची धडक बसल्यामुळे उमाबाई या गंभीर जखमी होऊन बाजूला पडल्या. त्यांना पाहण्यासाठी तीन महिला

पूर्वजांचेस्मरण म्हणून महाळ पूजा केली जाते. अष्टमी महाळ दिवशी घरात पिठापासून तयार केलेल्या हत्तीच्या प्रतिमांची पूजा करतात. नवमीला त्याचे विसर्जन संभाजी तलावाजवळ होते. तिथे अंघोळ करून महिला जलपूजन करतात. ही परंपरा असल्याची माहिती माजी उपमहापौर माणिकसिंग मैनावाले यांनी दिली. जखमी मृताच्या नातेवाइकांची आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.