आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेवर दुष्कर्म करणा-या सहा जणांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पन्नास वर्षीय महिलेवर तरुणाने दुष्कर्म केल्याप्रकरणी दोघा महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री सातच्या सुमाराला घडली. देवकाबाई शिंदे, झुंबर भोसले, सुहास भोसले, मनोज भोसले, राजू क्षीरसागर, रंगरेज (पूर्ण नाव नाही) यांच्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्या सोमवारी रंगभवन बस स्टॉपवर बसल्या होत्या. त्यावेळी देवकाबाई या रिक्षातून आल्या. काम आहे म्हणून त्यांना नातेवाइकाच्या घरी मनोहरनगरात नेले. सोबत झुंबरबाई होत्या. अन्य तिघेजण दुचाकीवरून आले. त्यांना खोलीत कोंडून मारहाण करू लागले. राजू याने त्या महिलेवर दुष्कर्म केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फौजदार कदम तपास करीत आहेत.

मुलीला पळवून नेले
सतरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शीतकुमार अरुण वाघमारे, इंदिराबाई वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीचे वडिलांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. 14 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.

महिलेचा विनयभंग
तुम्ही बदलीच्या ठिकाणी कामाला का जात नाही. तुमच्यामुळे आमचे नुकसान होत आहे असे म्हणत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीनिवास इटकर, इरफान चौधरी, शकील शेख, सुरेश इटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी पीडित महिलेच्या घरी घडली.