आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण सोसायटीत चालतो फक्त महिलाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरच्या काही महिलांनी 1968 मध्ये इंदिरानगरमध्ये महिला जीवन विकास गृहनिर्माण संस्था ही महिलांची संस्था स्थापन केली. 200 घरे महिला सभासदांच्याच नावावर देण्यात आली. त्याकाळी दिलेला आणि आताही लागू होणारा सकारात्मक संदेश आहे.

अशी झाली निर्मिती
तत्कालीन नगरसेविका निर्मला ठोकळ, सीमंतीनी बबलादी, मधुमालती कुलकर्णी, सुशीला दिकोंडा, कुसुम रसाळे, प्रभा सुलाखे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीनानाथ कमळे गुरुजी यांच्या प्रयत्नांनी ही संस्था अस्तित्वात आली. महिलांना कमी रकमेत घराचे स्वप्न साकारता यावे हा विचार होता. घर आई, मुलगी, सासू किंवा सुनेच्या नावे करण्याचा नियमही तयार करण्यात आला.

आयटीआयजवळ 18 एकरांत वसली वसाहत, सगळं काही महिलांच्या नावे

महिलाच पाहतात कामकाज संस्थेचे कामकाज महिलाच पाहतात. मासिक व वार्षिक सभा होतात. त्यांनी विकासाभिमुख कामे केली. सभागृह, खुला मंच, गणेशाचे मंदिर आदी बांधण्यात आले. सोसायटीत वृक्षांचे प्रमाणही अधिक आहे. सोसायटीच्या लेखापरीक्षणास ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळालेला आहे.


महाराष्ट्रातले पहिले उदाहरण
महिलांचीच गृहनिर्माण संस्था हे राज्यातील पहिले उदाहरण असेल. काँग्रेसच्या महिलांनी एकत्र येत त्याला आकार दिला. केवळ सामाजिक समता आणण्याचा प्रयत्नच नव्हे तर एक वेगळा विचार देण्याचाही प्रयत्न या महिलांनी केला आहे.


राज्य सरकारने केली मदत
राज्य सरकारने 12 हजार रुपयांत आयटीआयजवळ 18 एकर जागा संस्थेस दिली. महिला सभासदांकडून केवळ 126 रुपये घेतले. विकासकामासाठी 500 रुपये अशी रक्कम घेतल्यानंतर तीन प्रकारच्या घरांची बांधणी करण्याचे ठरले.


आजच्यासाठी संदेश
समाजात काही वाईट आहे, तसेच छानही आहे. याचेच उदाहरण महिलांचा राज असलेल्या जीवन विकास गृहनिर्माण संस्थेकडे पाहिल्यावर वाटते.’’ निर्मला ठोकळ, संस्थापक, इंदिरानगर


केवळ महिलांच्याच नावे घरे
संस्थेतील घरे महिलांच्याच नावे राहतील अशी खबरदारी घेण्यात आली. नोकरदार महिलांना चतुर्थांश रक्कम भरून जागेचा ताबा देण्यात आला. कर्जाची सोय करून देण्यात आली. गृहिणी असलेल्यांच्या पतींना सहसभासद करून घेण्यात आले. मात्र, घरे महिलांच्याच नावे देण्यात आली.