आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wonderful Connection Through Fashion Designing Devotion By Mrinalini

मृणालिनीने साधलाय फॅशन डिझायनिंग-भक्तीचा अनोखा संगम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - फॅशन डिझायनिंग आणि ईश्वरभक्तीचा अनोखा संगम पाहायचंय? दत्त चौकातील शुभराय मठात तो पाहायला मिळेल. मृणालिनी शंभूसिंग चौहान (गोपी) या तरुणीने नियमितपणे देवांची वस्त्रे तयार करण्यात स्वत:ला गुंतवून घेतले आहे.

बालपणापासूनच शुभराय मठात वाढलेल्या या गोपीने आपल्या मांडीवर देव ठेवून त्याची पूजा केली. सण, उत्सवात कोणते आभूषण घातले की देव सुंदर दिसेल याचा तिला ध्यास. यातूनच नवनवीन सजावट करण्यावर तिचा भर असतो. मठात दश्रनासाठी आलेल्या भक्तांना तिने केलेली सजावट भावायची. होम सायन्स आणि फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेली गोपी जरीच्या कपड्यांचे देखणे वस्त्र तयार करायला लागली. आज तिच्या वस्त्रांशिवाय मठातील एक ही कार्य पार पडत नाही.


गोपीनेच बनविली स्वामी सर्मथांची टोपी
भरजरी कपड्याचे मोतीकाम केलेली वस्त्रे, देवीची साडी-चोळी, शाल, मुकुट, कुंदन वर्क असलेले बिछाने, बाळकृष्णाचे कपडे, स्वामी सर्मथांची टोपी अशी नानाविध प्रकारची वस्त्रे ती तयार करते. मंदिरातील वस्त्रांसाठी ती कसलेही मानधन घेत नाही. अक्कलकोट येथील श्री स्वामी सर्मथ मंदिरातील ‘श्रीं’च्या मूर्तीसाठी तिने गेली काही वर्षे टोपी करण्याचे काम केले आहे. गोपीच्या हातांनी अतीव श्रद्धेने तयार झालेली टोपी श्री स्वामींच्या चरणी जाते.


ही सेवा अखंड घडो
देवाचे वस्त्र तयार करण्यात मला मोठा आनंद मिळतो. मूर्ती सजविण्याची सेवा मिळते, यामध्येच मला आनंद मिळतो. तो अखंड मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!’’ मृणालिनी शुभूसिंग चौहान