आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worker Movement Issue At Solapur, Divya Masrathi

काँग्रेसचे श्रेययासाठी आंदोलन, कामगारांचे काम बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील पाणी प्रश्नावर शनिवारी स्थायी समितीत आंदोलन झाले. सोमवारी महापालिका सभेत पाण्याच्या प्रश्नावर विरोधक आंदोलन करणार असल्याची कुणकुण लागताच त्याचे श्रेयय त्यांना मिळू नये यासाठी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनासमोर आंदोलन सुरू केले. पण, ते बुमरँग ठरले आणि त्यांच्यावर उलटले. आयुक्तांनी पदभार सोडताच त्याचे पडसाद शहरात उमटले.
पाण्यासाठी महापौरांनी सभा बोलावली असता. तेथे आयुक्तांना जाब विचारता आले असते. त्यापूर्वीच काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. सभागृहात पाण्याच्या प्रश्नावर दुपारी दोनला कार्यशाळा आयोजिली होती. आयुक्तांनी पदभार सोडल्याची माहिती मिळाल्याने युतीचे
नगरसेवक नागेश वल्याळ, सुरेश पाटीलसह आदींनी गुडेवार आल्याशिवाय कार्यशाळा नाही, असे म्हणत ती होऊ दिली नाही आणि सभागृहाला कुलूप ठोकले.
चांगल्या अधिकार्‍यांना नगरसेवक काम करू देत नाहीत असे म्हणत ‘नागरिकांनो, उठा, जागे व्हा, आयुक्तांच्या पाठीशी या’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक मनपासमोर झळकावले. सुहास कदमसह अन्य काही तरुणांनी आंदोलन केले.
पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सोमवारी महापालिका सभा बोलवण्यात आली होती. नगरसेवक आंदोलनात असल्याने कोरमअभावी महापौर अलका राठोड यांनी सभा तहकूब केली.