आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा साहित्या अभावी एकाचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ड्रेनेजलाइनमध्ये सफाई काम करण्यासाठी उतरलेला एक कर्मचारी पाण्यासोबत आलेल्या विषारी वायूच्या भपक्यामुळे गुदमरून मरण पावला तर अन्य एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. हा प्रकार मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास बुधवार पेठ परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील ड्रेनेज चेंबरमध्ये घडला. राम सायबण्णा नाईक (वय ४८, रा. सरस्वती चौक, उत्तर सदर बझार) असे मरण पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अनिल रामचंद्र बोरकर यांच्यासह मनपा झोन क्रमांक दोनचे पाच कर्मचारी बुधवार पेठेतील ड्रेनेज चेंबरमध्ये काम करण्यासाठी आले होते. त्यापैकी राम नाईक आणि अनिल बोरकर हे सर्व्हेअर जमखंडी यांच्यासोबत काम करण्यासाठी आले होते. ड्रेनेज सफाईचे काम करताना हा अपघात झाला.
वीटकरमदतीसाठी उतरले
ड्रेनेजझाकण काढल्यानंतर आत वायू साठला आहे की नाही याची पाहणी केली. अर्ध्या तासानंतर नाईक खाली उतरले. काही वेळाने नाईक त्यांचा आवाज येईना. त्यांना वाचविण्यासाठी वीटकर खाली उतरले त्यांचाही श्वास गुदमरला. यानंतर अग्निशामक दलाने दोघांना वर काढले. जोडभावी पोलिसात याबाबत प्राथमिक नोंद आहे. चेंबरच्या ठिकाणी सुरुवातीला िवषारी वायू नसावा. नंतर वायूच्या भपक्याने अपघात झाला.
मनपाकडेनाही सुरक्षा साहित्य
सफाईकाम करताना कर्मचाऱ्यांना ग्लोज, कृत्रिम श्वासाचे सिलिंडर असले पाहिजे. अंगावरही विशिष्ट प्रकारचे कपडे असणे आवश्यक असते. परंतु मनपाकडून पुरवठा या साहित्याची पुरवठा करण्यात येत नाही.
१९७६ पासून ड्रेनेज चेंबरमध्ये पडून अपघात झाल्याच्या आतापर्यंत एकूण १६ घटना झाल्या आहेत. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. १९७६ मध्ये जुनी मिलच्या मागील चेंबरमध्ये काम करताना चंद्रकांत अप्पा कांबळे हा मरण पावला होता तर दोन जून २०१४ रोजी अर्जुन सुरवसे हा शिवगंगा मंदिराजवळ काम करताना मरण पावला. मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये राम नाईक हे मरण पावले.