आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देसी डोळे परी निर्मिसी त्यांपुढे अंधार; हवा त्यांसी आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 15 ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अंध दिन किंवा पांढरी काठी सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही रस्ता ओलांडताना, चालताना संपूर्ण पांढर्‍या रंगाची किंवा वरू न दोन तृतींयांश पांढरा आणि खाली एक तृतीयांश लाल रंग असलेली काठी घेऊन चालणारे अनेक लोक पाहिले असतील. हे सर्व लोक देसी डोळे परी निर्मिसी त्यापुढे अंधार अशी निसर्गाची अजब निर्मिती असलेले अर्थात अंध असतात.


आज नॅबच्या वतीने कार्यक्रम
नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) संस्थेच्या वतीने जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त मंगळवारी कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ वाजता नेहरूनगर बसस्टॉपजवळ अंधांना रस्ता ओलांडण्यास मदत देणार्‍या फलकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पांढर्‍या काठीचा उपयोग
चढउतार, दगडधोंडे, खाचखळगे, कुत्रे, मांजर असे प्राणी, बसलेली-झोपलेली माणसे असे काठीच्या परीक्षेत्रात येणारे सगळेच अडथळे पार करता येतात.

पांढर्‍या काठीची गोष्ट
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर डॉ. रिचर्ड व्हुव्हर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी सोयीची पडेल अशी विशिष्ठ स्वरूपाची काठी तयार केली. ती काठी हुव्हर केन म्हणून ओळखली गेली. 1921 मध्ये मध्ये ब्रिस्टलचे फोटोग्राफर जेम्स विंग्ज यांना अपघातात अंधत्व आले. तेव्हा गडद रंगांच्या काठय़ा घेऊन फिरताना वाहनचालक आणि इतर डोळस व्यक्तींना दुरून ती ओळखणे कठीण जाते. हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल, असा पांढरा रंग आपल्या काठीला दिला.

अंधाची जीवन संजीवनी
डोळा असूनही नसल्यासारखा असतो. पांढरी काठी आम्हांस जणू आमचा डोळाच. कुणाच्याही आधाराशिवाय मुक्तपणे संचार करण्यासाठीचा आत्मविश्वास. ही पांढरी काठी म्हणजे आजची जीवनसाथी व संजीवनी आहे. पिराजी सुरवसे, पांढरी काठीधारक

पांढरी काठी जीवनरेखाच
जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त लोकांनी अंधांना रस्ता ओलांडताना मदत करणे, साहित्य पुरवून यामध्ये जनजागृती करावी. यामध्ये लोकसहभाग खूप आवश्यक आहे. अंधासाठी पांढरीकाठी म्हणजे जीवनरेखाच आहे. प्रकाश यलगुलवार, अध्यक्ष, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड