आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोट्यवधी झाडे लावा, अन्यथा सोलापूर उष्णतेचं बेट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज जेपरिणाम दिसतात त्याला वातावरण बदल म्हणतात. ज्याचा दीर्घकालीन परिणाम दिसतो त्याला हवामान म्हणतात. आपल्याला वातावरण बदलाचा नाही तर हवामान बदलाचा अंदाज मांडता येतो. २१ व्या शतकात प्रवेश केल्यापासून हवामान बदलाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. बदलांची तीव्रता वारंवारिता वाढत अाहे. याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅनेलवरील हवामान तज्ज्ञांनी ‘चरम हवामानाचा काळ’, असे म्हटले आहे.

२०१२ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानातील कराचीजवळ भागात तापमान हे ५३ अंश सेल्सिअस इतके होते तर अमेरिका, रशियासारख्या देशात वजा ५० अंश सेल्सिअस इतके तापमान होते. एखाद्यावेळी पाऊस इतका मोठा पडतो की ती ढगफुटीच ठरते. कधी गारपीट तर कधी पाऊस दडीच मारतो. हे सगळे चरम हवामानाच्या बदलांचा परिणाम होय.

उष्णतेच्या लहरी शीतलहरी येत राहतात. उष्णतेच्या या लहरीची वारंवारता कालावधी वाढत आहे.

सोलापुरात उष्णतेचं बेट तयार होईल. कारण सोलापुरात झाडांची संख्या कमी आहे. एक झाड रोज सरासरी किलो कार्बन शोषून घेतो. पश्चिम घाटातील जंगले लाख टन कार्बन शोषून घेतात. सोलापुरात वृक्षांची कमी असणारी संख्या, होणारी वृक्षतोड, वाहनातून बाहेर पडणारा धूर यामुळे सोलापूरचे तापमान वाढत आहे. या काळात जर उष्णतेची लाट आली तर त्याचा परिणाम अधिक जाणवतो. आपण हवामान बदलू शकत नाही मात्र हवामानाशी जुळवून घेता येतं. त्यासाठी सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यवधी झाडे लावली पाहिजे. तसेच खासगी वाहनांचा वापर कमी करून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. अन्यथा सोलापूर म्हणजे उष्णतेचं एक बेट बनल्याशिवाय राहणार नाही.

यंदाच्या उष्णतेच्या लाटांमध्ये आणखी एक गाेष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेंज. अल्ट्राव्हायलेट रेंज म्हणजे ओझोनच्या थराला छिद्र पडून त्या छिद्रातून येणारी सूर्यकिरणे होय. सर्वसाधारणपणे अल्ट्राव्हायलेट रेंज तीव्रता ही ते दरम्यान असायला हवी. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र त्याची तीव्रता ही ते १२ दरम्यान गेलेली पाहायला िमळाली. तेलंगणात वाढलेले तापमान हे त्याचेच द्योतक आहे. सोलापुरातही तापमान वाढीच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे आलेल्या उष्णतेच्या लाटा हे होय. आता या लाटा जंगल भागात आल्या तर त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. मात्र सोलापूरसारख्या शहरात आल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो.

यंदा उन्हाळ्यात सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. याचवेळी सोलापूरच्या जवळ असलेल्या उस्मानाबाद, लातूर आदी शहरांचे तापमान मात्र सोलापूरच्या तुलनेने कमी होते. याची कारणमीमांसा केलीय पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी.
-अतुल देऊळगावकर पर्यावरणतज्ज्ञ
(शब्दांकन: प्रसाद कानडे)