आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर-पेशंटमधील दुवा नर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- नर्स या डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा असतात. नर्स या रुणांना जीवदान देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ फॉर्मसीचे प्राचार्य आर. वाय. पाटील यांनी केले.

परिचारिका प्रशिक्षण शासकीय महाविद्यालयाच्या वतीने वल्र्ड नर्स डे च्या निमित्त महाविद्यालयातील सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करयात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग विभागाचे प्रमुख सुनील घाटे होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे रघुराज चव्हाण आणि स्वाती चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ. पुष्पा आग्रवाल, अधिसेविका नसीमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले की, रुग्णाच्या सुरक्षितेतची म्हणजे शुश्रषेची जबाबदारी परिचारिकेवर असते. परिचारिका पेशाची आता व्याप्ती वाढली आहे. या आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. पेशंट दाखल झाल्यानंतर परिचारिका देखभाल करत असते. नर्स या दिवसभर पेशंटसोबत असल्याने त्यांच्या नातेवाइकांशी अधिक चांगला संवाद साधू शकतात. असेही ते म्हणाले.

तणावमुक्त राहा : चव्हाण
रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवा आहे.त्यामुळे तणाव मोठय़ा प्रमाणात असतो. योगाच्या माध्यमातून आपले संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करावा. जर आपण मजबूत असाल तरच रुग्णांची सेव करता येईल. त्यामुळे कोणतीही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करून नये. रघुराज चव्हाण यांनी तणावमुक्त रहावे, असा सल्लाही दिला.

मेणबत्ती लावून अभिवादन
शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉकमध्ये रविवारी सकाळी सात वाजता कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना मेणबत्त्या लावून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रार्थनाही करण्यात आली.

नर्सची संख्या अपुरी
शासकीय महाविद्यालयात नर्सची संख्या अपुरी आहे. शासकीय महाविद्यालयातील नर्स प्रशिक्षण केंद्रात केवळ 200 नर्सच्या जागा आहेत. त्यामुळे अपुर्‍या संख्या असल्यामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येतो.’’ नसीमा शेख, अधिसेविका