आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांबरोबर कलावंतही घडवल्याचा आनंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नाइटहायस्कूलमध्ये शिक्षक होतो. नाट्य कलावंत म्हणूनही काम करता आले.त्यामुळे बदलत्या रंगभूमीचा अनुभव घेतला. शाळेतून विद्यार्थी घडवले तसेच कलावंतही घडवता आले, याचा अभिमान वाटतो, असे भावोद्गार पंडित नारायण कुलकर्णी (वैराग) यांनी काढले.

लायन्स क्लब सोलापूर परिवारतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कुलकर्णी, नारायण जानकी यांना जीवन गौरव तर मंजूषा काटकर यांना विशेष लक्षवेधी पुरस्काराने गौरवण्यात आले. रोटरी डिस्ट्रीकचे प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
१९५२ पासून कला सादर करणारे कुलकर्णी यांनी बदलत्या रंगभूमीचा वेध घेतला. पूर्वीच मेकप, माइक आदींची सोय म्हणावी तशी उपलब्ध नव्हती. त्यामुळे स्वत:च मेकप करणे, माइक नसताना आवाज वाढवून बोलणे असे प्रकार करावे लागत. स्त्री पात्र मिळत नव्हते, पुरुषांनाच स्त्री पात्र करावे लागायचे. अशा आठवणी या वेळी कुलकर्णी आणि नारायण जानकी यांनी सांगितल्या.
अध्यक्ष आनंद कुर्डुकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय नरेंद्र गंभीरे यांनी करून दिला. बाळासाहेब कुलकर्णी यांनी आभार मानले. या वेळी लायन्सचे पदाधिकारी प्रकाश भुतडा, उन्मेश करनावट, दिनेश बिराजदार, रेखा लाहोटी, संध्या बंडेवार, सपना राऊत आदी उपस्थित होते.
जागतिक रंगभूमीदिननिमित्त लायन्स जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी डाॅ. व्यंकटेश मेतन यांच्या हस्ते पंडित नारायण कुलकर्णी, नारायण जानकी, श्रीमती मंजूषा काटकर यांना प्रदान करण्यात आला.
शिंदे, फय्याज यांना घडवले
नाइटहायस्कूलमध्ये शिकवायला होतो, तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांना मीच प्रवेश दिला, त्यांना चांगले शिक्षणही दिले, तसेच नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष फय्याज आणि अभिनेत्री सरला येवलेकर यांच्यासारखे विद्यार्थी आणि नाट्य कलावंत मला घडवता आले, असे पंडित कुलकर्णी यांनी सांगितले.